Latest Marathi News
Ganesh J GIF

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधीच एकनाथ शिंदे राजीनामा देणार?

कायदेतज्ञांचे मोठे विधान, सांगितल्या निकालाच्या चार शक्यता, कसा असेल निकाल?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल ११ ते १२ मे रोजी लागण्याची शक्यता कायदेतज्ञ असिम सरोदे यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी निकालाच्या चार शक्यता व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे निकालाची उत्सुकता वाढली आहे.

एकनाथ शिंदे अपात्र झाले तर उरलेले आपोआप अपात्र होतात त्यामुळे सरकार कोसळेल. त्यांच्याकडे संख्याबळ राहणार नाही. कदाचित त्याआधीच एकनाथ शिंदे राजीनामा देऊ शकतात,”असे मोठे विधान असिम सरोदे यांनी केले आहे. त्यामुळे निकालाची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यांनी वर्तवलेल्या चार शक्यता म्हणजे सरोदे यांनी वर्तवलेली पहिली शक्यता म्हणजे आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणे हा सोपा निर्णय म्हणून अवलंबला जाऊ शकतो, त्याशिवाय बहुमत चाचणी करण्यासंदर्भात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी काढलेला आदेशच रद्द ठरवला जाऊ शकतो. बहुमत चाचणीचा आदेश ही राज्यपालांची कृती घटनाबाह्य असल्याने ती रद्द ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे अशीही एक शक्यता आहे. तिसरी शक्यता म्हणजे पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून थेट न्यायालयच १६ आमदारांना अपात्र ठरवू शकते, यासाठी घटनेतील कलम १४२ चा आधार न्यायालय घेऊ शकते. एक धूसर व कदाचित अस्पष्ट शक्यता आहे की हे प्रकरण मोठ्या संविधानिक गुंतागुंतीचे आहे व त्यामुळे १० व्या परिशिष्टासंदर्भात आधी झालेल्या निर्णयांचा संदर्भ घेऊन हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले जाऊ शकते,” अशीही शक्यता सरोदे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एक शक्यता वगळली तरी शिंदे अडचणीत येण्याची शक्यता जास्त आहे.

अपात्र झालेले आमदार ६ वर्ष कोणतीही निवडणूक लढवू शकणार नाहीत अशी मागणी सरोदे यांनी केली आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणी पूर्ण झाली झाली असून सुप्रीम कोर्टाने काही निर्णय राखून ठेवला आहे. तब्बल ९ महिन्यांच्या युक्तिवादानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला नक्की काय लागणार याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!