Latest Marathi News
Ganesh J GIF

कंगना राणावत मथुरेतून लोकसभा निवडणूक लढणार?

हेमा मालिनीचा कंगणाला हा टोला, बघा नेमक काय म्हणाल्या...

दिल्ली दि २४ (प्रतिनिधी)- नरेंद्र मोदींचे जाहीरपणे समर्थन करणारी आणि नेहमीच वादात राहिलेली अभिनेत्री कंगना रानावत मथुरेतून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय गोटात सुरु आहेत. पण यासाठी भाजपाच्या विद्यमान खासदार हेमा मालिनी यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. पण यावरून त्यांनी तिरकस प्रतिक्रिया देत कंगणाची तुलना राखी सावंत बरोबर केली आहे.

हेमा मालिनी २०१४ आणि २०१९ अशी सलग दोन वर्ष मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर खासदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार कुंवर नरेंद्र सिंह यांचा जवळपास तीन लाखांच्या मताधिक्याने धुव्वा उडवला होता. कंगणाबद्दल हेमा मालिनी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मला तिकीट द्यायचे की नाही हे कृष्ण भगवान बघून घेईल.कंगना इथून निवडणूक लढणार असेल तर ती चांगली गोष्ट आहे पण तुम्ही सगळ्यांच्या डोक्यात टाकलंय की खासदार फिल्म स्टारच बनणार, त्यामुळे उद्या राखी सावंतही निवडणूक लढवायची म्हणेल असा सवाल विचारला आहे. पण त्यांनी कंगणाची तुलना राखी सावंत बरोबर करत पक्ष नेतृत्वालाही इशारा दिला आहे. हेमा मालीनी यांनी आत्तापर्यंत केलेली कामगिरी पाहता त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता कमी मानली जात आहे.

 

भाजपाने २०२४ साली होणाऱ्या शोकसभेसाठी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यातूनच मोदी समर्थक कंगना मथुरेतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. कंगनाने उघडपणे भाजपाचे समर्थन करताना भाजपा विरोधकांवर निशाना साधला आहे. त्यामुळे ती आगामी लोकसभा निवडणूक लढणार अशी चर्चा होती. त्यामुळे कंगणा खरच लढणार की ही फक्त चर्चा आहे, याचा खुलासा होण्यासाठी लोकसभा निवडणूकीची वाट पहावी लागणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!