Latest Marathi News
Ganesh J GIF

मावळ लोकसभा मतदारसंघातून आमदार सुनिल शेळके लोकसभा लढणार?

आमदार सुनिल शेळकेंचे खासदार बारणे यांना आव्हान, भाजपाचाही दावा, उमेदवारीवरून युतीत वादाची ठिणगी?

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यापुढील सर्व निवडणुका महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशा होण्याची शक्यता आहे.पण काही जागांवर सर्वच पक्ष दावा करत आहेत. त्यामुळे जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यातच मावळ लोकसभेमुळे महायुतीतील दोन गटात सामना रंगला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे म्हणून खासदार आहेत. २०२४ साठीही मीच याठिकाणी उभा राहणार असे श्रीरंग बारणेंनी सांगून टाकले. पण आता अजित पवार गटाने देखील मावळ लोकसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. पण अजित पवार गटाकडून पार्थ पवार एैवजी आमदार सुनिल शेळके यांचे नाव चर्चेत आहे. भाजपचे नेते आणि माजी मंत्री बाळा भेडगे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उमेदवारीवर दावा सांगितला आहे. त्यामुळे महायुतीत मावळ वरून जोरदार वाद होण्याची शक्यता आहे. सुनिल शेळके यांनी तर बारसे यांना थेट आव्हान दिले आहे. खासदार बारणे यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी मागण्यापूर्वी आपल्या नऊ वर्षांच्या कामाचा लेखाजोखा द्यावा. मावळ तालुक्यात काय कामे आणली, कोणत्या मोठ्या योजना आणल्या, किती निधी आणला? हे जनतेसमोर मांडावे, असे आव्हान दिले आहे. तसेच दोन्ही टर्मला ते मोदी करिष्म्यामुळे निवडून आले, हे देखील शेळके यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे मावळ मतदारसंघात पक्षाची मोठी ताकद असल्याने ती मिळावी म्हणून आठ दिवसांत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह युतीच्या नेत्यांपुढे ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अर्थात आपण मात्र लोकसभा निवडणुक लढण्यास इच्छूक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. खासदार बारणे यांना २०१४ मध्ये उमेदवारी मिळावी, यासाठी आम्ही तन-मन-धनाने प्रयत्न केले. युतीमधील आम्ही कार्यकर्ते होतो. त्यामुळे आम्ही दोन्ही वेळेस प्रामाणिकपणे त्यांचे काम केले. याची देखील आठवण करुन दिली आहे. तर भाजपाकडून बाळा भेगडे यांनी देखील दावा केला आहे. त्यामुळे मावळवरून महायुतीत महाभारत होण्याची शक्यता आहे. याचा फायदा ठाकरे गटाला होण्याची शक्यता आहे. पिंपरी, मावळमध्ये राष्ट्रवादीचा तर पनवेल, चिंचवडला भाजपचे आमदार आहेत. तर उरणचे अपक्ष आमदार भाजपशी संलग्न आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचा केवळ कर्जतमध्येच आमदार आहे. त्यामुळे युतीतील वरिष्ठ नेते यावर कसा तोडगा काढतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा मावळ लोकसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला होता. याची सल अजित पवार अजून विसरलेले नाहीत. लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून शिवसेनेचे मावळवर वर्चस्व आहे. सलग तिसऱ्यावेळी शिवसेनेचा खासदार आहे. तिन्हीवेळेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारून शिवसेना विजयी झाली आहे. पण आता शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!