Latest Marathi News
Ganesh J GIF

राज ठाकरेंचा जुना सहकारी ठाकरे गटात प्रवेश करणार ?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वसंत मोरे हे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार आज दुपारी साडेबारा वाजता ‘मातोश्री’वर ही भेट होणार आहे.वसंत मोरे हे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर येणार आहेत. वसंत मोरे यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि उपनेते साजन पाचपुते हे देखील ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार आहेत.

मिळत असलेल्या माहितीप्रमाणे वसंत मोरे हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहेत. ते लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यापूर्वी ते आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी ‘मातोश्री’वर जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत पुण्यातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी वसंत मोरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती. मात्र महाविकास आघाडीमध्ये पुण्याची ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली.

काँग्रेसकडून या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. वसंत मोरे लोकसभेची ही निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढले. त्यामुळे पुण्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली, आता आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!