Latest Marathi News
Ganesh J GIF

हडपसरला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार; प्रशांत जगतापांनी व्यक्त केला निर्धार

हडपसर विधानसभा मतदारसंघाला पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि गुन्हेगारीमुक्त बनवायचे आहे. मतदारसंघातील समस्या सोडवण्यात विद्यमान आमदार सपशेल अपयशी ठरले आहेत. हा बॅकलॉग भरून काढत महाविकास आघाडी हडपसरला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहे,’ असा निर्धार हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला. बुधवारी सकाळी ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन प्रशांत जगताप यांनी प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघातील भोसले गार्डन येथे जगताप यांच्या मध्यवर्ती निवडणूक कचेरीचे उद्घाटन झाले.

याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, शिवसेना उपशहर प्रमुख समीर तुपे, माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, निलेश मगर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक विजय देशमुख, माजी नगरसेवक योगेश ससाणे, काँग्रेसचे हडपसर विधानसभा अध्यक्ष दिलीप तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे, शमशुद्दिन इनामदार, सचिन ननावरे, पूजाताई कोद्रे, हेमलताताई मगर, रत्नप्रभाताई जगताप यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी प्रशांत जगताप म्हणाले, “ग्रामदैवत भैरवनाथाला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ करत आशीर्वाद घेतला. कुटुंबातील सदस्य, तसेच महाविकास आघाडीतील सर्व नेतेमंडळी सोबत होते. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांनी हडपसरच्या विकासासाठी निवडणूक लढविण्याची संधी दिली. आपल्या सर्वांच्या साथीने या संधीचे सोने करायचे आहे. या मतदारसंघातील प्रश्न विधिमंडळात मांडून न्याय द्यायचा आहे. येथे पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, वाढती गुन्हेगारी आदी समस्या आहेत. निष्क्रिय विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षात काहीही काम केले नाही. त्यामुळे मला जनाधार मिळत असून, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने विधिमंडळात हडपसरचे नेतृत्व करेल, असा विश्वास आहे.”

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!