Latest Marathi News
Ganesh J GIF

एकनाथ शिंदेंच्या लाडक्या आमदाराची आमदारकी रद्द होणार?

विधानसभा अध्यक्षांची नोटीस, आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश, आदिवासी समाजही नाराज

पुणे – जुन्नर विधानसभेचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केल्याने त्यांच्या अपात्रतेची मागणी करणारे पिटीशन ॲड. विजय कुऱ्हाडे यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केले आहे. त्यामुळे सोनवणे अडचणीत आले आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शरद सोनवणे यांनी शिंदे गटात सहभाग घेतला होता. मात्र, अजित पवार यांच्या महायुतीतील सहभागामुळे जुन्नरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आणि अतुल बेनके यांना उमेदवारी मिळाली. यानंतर सोनवणे यांनी अपक्ष निवडणूक लढवून ६,६६४ मतांनी विजय मिळवला. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०२५ रोजी नारायणगाव येथे झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर ॲड. विजय कुऱ्हाडे यांनी दि. १५ मे २०२५ रोजी सोनवणे यांच्या अपात्रतेची मागणी करणारे पिटीशन दाखल केले. विधानसभा अध्यक्षांनी दि. ११ जून २०२५ रोजी सोनवणे यांना सात दिवसांत लेखी अभिप्राय सादर करण्याचे आदेश दिले. अभिप्राय न मिळाल्याने दि. ९ जुलै २०२५ रोजी पुन्हा सात दिवसांची मुदत देण्यात आली. ही मुदतही संपुष्टात आली असून, सोनवणे यांचे उत्तर काय असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर आमदार सोनवणे यांनी आदिवासी समाजाचे नेते व राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांचेबाबत खालची भाषा वापरून आदिवासींबरोबर सरकारचा देखील अपमान केला आहे. आमदार सोनवणेविरुद्ध गुन्हा दाखल न केल्यास राज्यभर संतप्त परिणाम उमटतील, असा इशारा ट्रायबल फोरम, आदिवासी परधान जमात संघटना आणि उलगुलान संघटनेने दिला आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष यांचे मला नोटीस आले आहे. नोटीस खिशात आहे.काहीच होणार नाही. मी पाच वर्षे आमदार राहणार आहे, असे स्पष्टीकरण सोनवणे यांनी दिले आहे.

आदिवासी विभागाला मूर्ख मंत्री भेटलाय आणि हा अधिकारीदेखील चोर, आम्ही काय कोणाच्या बापाला बांधील आहे का? कोणाचा रुपाया खात नाही, अशी भाषा सोनवणे यांनी वापरली होती. पण आता त्यांनी माफी मागितली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!