कर्नाटकात या पक्षाचे सरकार येणार? पहा सर्व्हे
सर्व्हेमध्ये धक्कादायक खुलासा, या नेत्याला मुख्यमंत्री पदासाठी पसंती, बघा अंदाज
बंगरुळ दि ३०(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला आहे. भाजप, काँग्रेससह इतर अन्य पक्षांनी सत्तेचा दावा केला आहे. कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एबीपी-सी वोटरच्या महाओपिनिअन पोल घेतला. यात कॉंग्रेसलाच बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे.
सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे तर काँग्रेसही यंदा जोरदार टक्कर देताना दिसत आहे. भाजपने पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांची फौज प्रचारात उतरवली आहे. पण समोर येत असलेल्या सर्व्हेनुसार भाजपाला सत्ता राखण्यात अपयश येईल असे दिसून येत आहे. आताही एबीपी-सी व्होटर संस्थेचा ओपिनियन पोल आला आहे. या अहवालात जे निष्कर्ष काढण्यात आला आहे त्यातून भाजप सत्तेपासून दुर असल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत येणार असल्याचा ओपिनियन पोलचा अंदाज आहे. राज्य सरकारच्या कामकाजावर जनता नाराज असल्याचे सर्व्हेतून दिसून येत आहे. पाहूया एबीपी सी व्होटरने केलेला सर्वेक्षण
पक्ष आणि संभाव्य जागा
काँग्रेस – १०७ ते १२९
भाजप – ७६ ते ८६ जागा
जेडीएस – २३ ते ३५ जागा
अन्य पक्ष – ० ते ५ जागा
मुख्यमंत्रिपदासाठी पसंती
सिद्धरामय्या – ४१ टक्के
बसवराज बोम्मई – ३१ टक्के
डीके शिवकुमार – ३ टक्के
अन्य – ३ टक्के
२०१८ च्या निवडणुकीत कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला १०४ जागा मिळाल्या होत्या.काँग्रेसला ८१ तर अन्य पक्षाला ३७ जागा मिळाल्या होत्या. भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी बहुमत नव्हते. यामुळे सुरुवातीला काँग्रेस अन् जेडीएसचे सरकार सत्तेवर आले. परंतु ऑपरेशन लोटसनंतर २०१९ मध्ये हे सरकार पडले आणि भाजप सरकार सत्तेवर आले होते.