Latest Marathi News
Ganesh J GIF

गाैतमी पाटीलवरुन राज्यातील दोन नेत्यात कलगीतुरा

सबसे कातील गाैतमी पाटीलचा राजकारणातही राडा, कोणत्या नेत्यात गाैतमीची ठिणगी?

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलची सध्या तरुणाईला प्रचंड क्रेझ आहे. पण आता गाैतमी पाटीलची राजकारणतही जोरदार चर्चा होताना दिसत आहे. गाैतमीवरुन अजित पवार आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप आणि टोलेबाजीच्या फैरी झडत आहेत.

गाैतमी पाटीलने काही दिवसापूर्वी बैलासमोर डान्स केला होता त्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही ती बैलासमोर नाचो किंवा आणखी कोणासमोर नाचो, तुला काय त्रास होतोय ? अशी खोचकदेत पत्रकारांना टोला लगावला होता. त्यानंतर आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीही यात उडी घेत अजित पवार यांना टोला लगावला आहे. गौतमी पाटील यांना ओळखता का, असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर सत्तार म्हणाले, सिल्लोड येथे एकदा कृषी महोत्सवात त्यांचा कार्यक्रम पाहिला होता. सिल्लोडला गौतमी पाटील यांचा कार्यक्रम ठेवला होता. आता आणखी एक वेळ त्यांचा कार्यक्रम ठेऊ आणि या कार्यक्रमाला अजित पवार यांनाही निमंत्रण देऊ. अजितदादा मेरे दोस्त है.., गलतियां सबसे होती है, अब्दुल सत्तार की छप जाती है, अजित पवार की छुप जाती है, अशी शायरी करत चिमटा काढला आहे. यावेळी सत्तार यांनी कृषी विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देत लेखाजोखाच सादर केला.

ज्यांचं वय डोळे मारण्याचे ते डोळे मारतात. आजकाल डोळे मारण्याचा सीझन सुरू आहे. ज्यांचं वय आहे डोळे मारण्याचं ते डोळे मारतात, किंवा ज्यांनी लहानपणी डोळे मारले नसतील ते आता मारू लागले आहेत. अजित पवार जे काही बोलतात त्याला महत्त्व आहे. कारण ते राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. असेही सत्तार म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!