Latest Marathi News
Ganesh J GIF

आगामी लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात या पक्षाचा गेम होणार?

आगामी लोकसभा निवडणूकीचा सर्व्हे समोर, देशात या पक्षाची सत्ता, महाराष्ट्रात मात्र धक्कादायक आकडेवारी समोर

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- देशात आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. कारण लोकसभा निवडणूक आठ-नऊ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे भाजपाप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडिया एकत्र आली आहे. पण अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर करण्यात आलेल्या सर्व्हेत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

महाराष्ट्रात भाजपाने दोन विरोधी पक्षांत फूट पाडण्यात यश मिळवले आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना फोडत स्वतःकडे केल्यानंतर कागदावर तरी भाजपा बलाढ्य दिसत आहे. पण समोर आलेल्या आकडेवारीनुसार शिंदे गट आणि अजित पवार गटाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या ओपिनिअन पोलमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत एनडीए विरुद्ध इंडिया अशी लढत होणार आहे. ओपिनियन पोलमध्ये ५४३ पैकी ४६३ मतदारसंघांचा अभ्यास करण्यात आला असून एनडीए तिसऱ्यावेळी सत्तास्थापन करण्यात यशस्वी होणार आहे. एनडीएला २४५ तर इंडीयाला १६८ आणि अन्य पक्षांना ५० जागा मिळण्याचा अंदाज आहे. पण महाराष्ट्रात मात्र मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजपाला २० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण शिंदे गटाला फक्त दोनच जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरे गटाला ११ जागा मिळताना दिसत आहेत. याचाअर्थ ठाकरे शिंदेला मोठ्या फरकाने मात देण्यात यशस्वी ठरण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीत शरद पवार गटाला ४ तर अजित पवार गटाला २ जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच काका पुतण्याला मात देण्यात यशस्वी होणार आहेत.

अर्थात जाहीर करण्यात आलेली आकडेवारी सध्याच्या राजकीय स्थितीवरून वर्तवण्यात आली आहे. पण आगामी काळात काय राजकीय घडामोडी होणार त्यावरून बदल होऊ शकतात पण देशात भाजपा सत्ता मिळवत असला तरी महाराष्ट्रात मात्र भाजपाचे पक्ष फोडीचे धोरण घातक ठरण्याची शक्यता दिसत आहे. पण आकडेवारीत मात्र सामना बरोबरीत सुटण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!