महाराष्ट्रातील हे लोकप्रिय वकील करणार भाजपात प्रवेश?
जळगावमधून लढणार लोकसभा निवडणुक, भाजपातील या तीन खासदारांचा पत्ता कट, हे असणार नवीन उमेदवार?
जळगाव दि २४(प्रतिनिधी)- देशात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. काही ठिकाणी विद्यमान खासदारांचा पत्ता कट होऊन नवीन उमेदवारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यात आता भाजपाच्या तीन खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र दाै-यावर आलेले अमित शहा यांनी भाजपाच्या उमेदवारीविषयी चर्चा केली. यात भाजपाच्या विद्यमान तीन खासदारांवर फुली मारण्यात आली आहे. त्यामुळे नवीन उमेदवारांना संधी मिळणार आहे. जळगाव, पुणे, धुळे आणि मुंबईतील एका उमेदवाराचा पत्ता कट होणार आहे. पुण्यातील खासदार गिरिश बापट यांचे निधन झाल्यामुळे तिथे नवीन उमेदवार देणे क्रमप्राप्त आहे. सध्या जळगावमधून उज्ज्वल निकम, धुळ्यातून प्रतापराव दिघावकर, मुंबईतल्या एका मतदारसंघासाठी माधुरी दीक्षित तर पुणे लोकसभा मतदारसंघातून सुनील देवधर यांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे. जळगावचा इतिहास पाहता कायमच उमेदवारी बदलण्यात आला आहे कारण २०१४ साली जळगावमध्ये ए.टी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर २०१९ साली उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता त्यांचाही पत्ता कट होऊन निकम यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. उज्ज्वल निकम यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून याआधीही आॅफर देण्यात आली होती. पण निकम यांनी कोणतीही आॅफर स्विकारली नव्हती. मध्यंतरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेकदा दिसले होते. पण त्यावेळी कायदेविषयक चर्चा झाली होती, असे निकम म्हणाले होते. त्यामुळे आता निकम भाजपाचा प्रस्ताव स्वीकारणार का? की नाकारणार याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक राजकीय समीकरणे बदलताना दिसणार आहेत.
अमित शहांबरोबर झालेल्या बैठकीत आमदार
अपात्रतेबाबतच्या सुनावणीवरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सागर बंगल्यावर इतर भाजप आणि शिंदे गटातील नेते उपस्थित होते. मात्र अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यां तिघांमध्येच बंद दाराआड चर्चा झाली. सुनावणीनंतर येणार निर्णय आणि त्याचे पुढील राजकारणावर होणारे परिणाम याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.