
…म्हणून नरेंद्र मोदींनी हजारो कोटी खर्चून नवीन संसद बांधली!
नवीन संसद भवन बांधण्याबाबत धक्कादायक खुलासा, ज्योतिष कनेक्शनचा मोठा दावा, वाचा नेमके काय झाले?
दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- संसदेचे विशेष अधिवेशन नुकतेच पार पडले. यावेळी विशेष अधिवेशन नवीन संसदेत पार पडले. गणेश आगममाच्या मुहूर्तावर नवीन संसदेत कामकाजाला सुरुवात करण्यात आली. पण विरोधकांनी मात्र नवीन संसद म्हणजे मोदी मल्टीफ्लेक्स असल्याची टिका करत आहेत. तर भाजपाकडुन आगामी काळाचा विचार करुन ही संसद बांधल्याचा दावा केला जात आहे. पण आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवीन संसद भवनाच्या बाबतीत धक्कादायक खुलासा करत मोदी सरकारवर टिका केली आहे.
संजय राऊत यांनी सामनात रोखठोक लिहित मोठे खुलासे केले आहेत. तसेच जुन्या संसद भवनास विसरता येणे कठीण आहे,” असं राऊत यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, आणखी किमान ५० ते १०० वर्षे मजबुतीने उभे राहील असे आधीचे संसद भवन असताना नव्या संसद भवनाचा घाईघाईने केलेला हा अट्टहास कशासाठी? दिल्लीतील वर्तुळात यावर ज्या चर्चा सुरू आहेत. तसेच दिल्लीचे सरकार हे अंधश्रद्धा व अंधभक्तांच्या वर्तुळात फिरत आहे. देश चालवणाऱ्यांच्या मनावर अंधश्रद्धा, ग्रह, कुंडलीचा पगडा आहे. “सध्याचे संसद भवन १० वर्षांनंतर तुम्हाला धार्जिणे नाही. १० वर्षांपेक्षा जास्त काळ येथे कोणी टिकत नाही. त्यामुळे नव्या संसद भवनाची उभारणी करा” असा सल्ला ज्योतिषींनी दिला होता. त्यामुळे नव्या संसद भवनाची उभारणी २०२४ च्या आधी करण्यात आली. एका बाजूला आपल्या वैज्ञानिकांनी चंद्रावर यान उतरवलं व त्याच देशाचे राज्यकर्ते सत्ता जाऊ नये या अंधश्रद्धेतून नवे संसद भवन उभारतात हे चित्र चांगले नाही, असेही राऊत म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी नव्या संसद भवनातील दोषांवरही टीका केली आहे. नव्या संसद भवनात सेंट्रल हॉलच नसल्याचं राऊत म्हणाले. जुन्या संसद भवनात सेंट्रल हॉल होता. लोकसभा आणि राज्यसभेतील या लॉबीला महत्त्वाचं आणि ऐतिहासिक स्थान होतं. ही लॉबीच आता तोडून टाकली गेली आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली आहे. आता भाजप यावर काय बोलणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
नव्या संसद भवनावर दिल्लीतील ज्योतिषाचार्य आणि बाबाबुवांची चलती आहे. त्यांची छाया या संसदेवर पडली आहे, अशी चर्चा दिल्लीत सुरू आहे. जुन्या संसदेचे संविधानाचे म्युझियम वगैरे होईल असे सांगितले जाते. नवी इमारत म्हणजे आज तरी गोंधळ दिसत आहे. नवीन संसद लोकशाहीचे मंदिर वाटत नाही असेही राऊत म्हणाले आहेत.