
शरद पवार यांचा आणखी एक नातू राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवारांचे बंधू श्रीनीवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कारण, युगेंद्र पवार हे बारामतीमधील पक्ष कार्यालयात आले आहेत . मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यालयात आल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले. युगेंद्र पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत. मात्र, सध्या ते शरद पवार यांच्यासोबत आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जे आता प्रचारासाठी फिरत आहेत ते तुम्हाला सात तारखेनंतर कुठेही दिसणार नाहीत असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे बारामतीतल्या पक्ष कार्य़ालयात आले असून मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आलो आहे, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले.
युगेंद्र पवार एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, निवडणूक काळात मी फिरत होतो. यावेळी लोक प्रश्न सांगत होते. मी त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांचा संपर्क वाढला आहे. त्यामुळे मध्यवर्ती कार्यालयात मी लोकांना भेटत असल्याचे ते म्हणाले. मी गेली तीन ते चार वर्ष झालं कण्हेरीच्या घरी भेटायचो. पण आता इथे भेटत आहे. मध्यवर्ती कार्यालयात लोकांना भेटायला सोपं पडतं असं युगेंद्र पवार यांनी सांगितले.
यावेळी त्यांना राजकारणात येण्याचा विचार आहे का? असे विचारले असता युगेंद्र पवार म्हणाले, राजकारणात यायचा विचार केला नाही, परंतू, जर राजकारणात पुढे यायचं असेल तर लोकांची कामे करावी लागतात. त्यांचे प्रश्न समजावून घ्यावे लागतात. मी अजून एवढा पुढचा विचार केला नाही, पुढचं पुढे बघू असे त्यांनी सांगितले.माझे इथे छोटे-मोठे व्यवसाय आहेत. राजू दादा देखील इथेच शेती क्षेत्रात काम करतात.रणजीत अण्णा देखील इथेच काम करत असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले. आमची शेती इथेच असल्याचे त्यांनी सांगितले.अजित दादांनी मिशी संदर्भात जे वक्तव्य केले आहे त्यावर मी कसे बोलणार? अजितदादांवर बोलण्या इतपत मीमोठा नसल्याचे त्यांनी सांगितले. याआधी आम्ही सगळे इथेच असतो, कामानिमित्त बाहेर असतो असे ते म्हणाले.सोमवार ते गुरुवार मी इथेच असतो. आता लोकांना याबाबत माहित झाले आहे, असे योगेंद्र पवार यांनी सांगितले.