
महिलेची टोलनाक्यावर टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
चार सेकंदात लगावल्या सात चापटा, व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, महिलेवर कारवाई होणार?
हापूर- टोल नाक्यावर तेथील कर्मचाऱ्यांशी होणारे वाद अनेकांनी पाहिले आहेत. त्यांचे वाद अनेकदा पैशावरुन होत असतात. यामुळे अनेकदा कठीण परिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेशच्या हापूर येथील छिजरसी टोल प्लाजावर वाहनधारक महिला आणि टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यातील वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक महिला प्रवास करत असताना छिजरसी टोलनाक्यावर आली पण तिच्या फास्टटॅग कार्डवर बॅलन्स नव्हता, त्यामुळे बुम उघडला नाही, त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांने टोलचे पैसे मागितले. पण महिलेने पैसे न देता कर्मचाऱ्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. एवढचं नाहीतर तिने बुधमध्ये घुसत कर्मचाऱ्याला मारहाण देखील केली.
व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, एक महिला एका टोल कर्मचार्याला मारहाण करत आहे, ही महिला त्या कर्मचाऱ्याला अवघ्या चार सेकंदांमध्ये सात वेळा चापट मारते तर अचानक घडलेल्या घटनेमुळे टोल कर्मचारी पूर्णपणे गोंधळल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहूण महिलेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर उत्तर प्रदेश पोलिसांना या व्हिडीओबद्दल टॅग केले आहे आणि टोल कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या महिलेविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.