
महिलेला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले आणि लग्नच लावून टाकले
महिला आणि प्रियकराच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल, पतीने संबंध तोडले तरुण फरार तर महिला रूग्णालयात
सहरसा – देशात अनैतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यातूनच पती आणि कुटुंबीयांच्या हत्या देखील झाल्या आहेत. आता बिहारमधून अशीच एक घटना समोर आली आहे. पण यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या कृतीची जोरदार चर्चा होत आहे.
बैजनाथपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे प्रकरण घडले आहे. महिलेचे नाव आरती असून तिच्या पतीचे नाव राकेश आहे. राकेशची लॉर्ड बुद्धा मेडिकल समोर चहाची टपरी आहे. आरती आणि राकेशचे दहा वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले देखील आहेत. आरती देखील राकेशला मदत करण्यासाठी चहाच्या टपरीवर थांबत असे. त्याचदरम्यान आरतीची ओळख कॉलेज कॅन्टिनमध्ये काम करणाऱ्या रांची येथील विशाल मुखर्जी सोबत झाली. आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ३ जुलै म्हणजे घटनेच्या दिवशी दोघेही एका खोलीत असताना गावकऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. पहिल्यांदा गावकऱ्यांनी तरूणाला बेदम चोप देत झाडाला बांधून टाकले. आरतीचा पती याने यावेळी भविष्यात हिने मला आणि मुलांना मारून टाकले असते, असा आरोप करत आरतीच्या कपाळावरील सिंदूर पुसून टाकले. तसेच तिला सोबत ठेवणार नसल्याचे सांगितले. यावेळी गावकऱ्यांनी विशालला आरतीला सिंदूर लावण्यास सांगितले. एवढेच नाहीतर त्यांनी दोघांचे लग्न देखील लावून टाकले. विशेष म्हणजे सामान्य लग्नाप्रमाणेच गाणी आणि रितीरिवाजाप्रमाणे हे लग्न लावण्यात आले. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी विशाल कोणतीही पूर्वकल्पना न देता फरार झाला. यामुळे आरतीला धक्का बसला असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
https://x.com/KarnalKumar20/status/1942031909174837558?t=yC_Yy6Q8DldOxFwbpTeuYg&s=19
सहरसामधील या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत पोलिस तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळालेली नाही, मात्र स्थानिक प्रशासनाकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.