
पतीच्या हत्येनंतर महिलेने केली सासऱ्याची हत्या
प्रियकरासाठी केली दोघांची हत्या, प्रियकरानेच केला होता जामीन, बबलीचा कारनामा थक्क करणारा
आग्रा – उत्तरप्रदेशच्या आगरा येथे एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील एका महिलेने प्रियकरासोबत मिळून सासऱ्याची हत्या केली आहे. ती पतीच्या हत्येप्रकरणी याआधीही जेलमध्ये गेली होती.
बबली असे खुनी महिलेचे नाव आहे. आरोपी महिलेचा पती हरीओमची हत्या सहा वर्षांपूर्वी झाली होती. याप्रकरणी पत्नी बबलीला तुरुंगवासही भोगावा लागला होता. बबलीला दोन मुली आणि एक मुलगा होता. बबली आणि प्रेम सिंह यांच्यात खूप दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरु होतं. प्रेम सिंह याआधीही अनेक प्रकरणात जेलमध्ये गेला होता. बबलीचे प्रेमसिंह बरोबर प्रेमसंबंध होते. प्रेम सिंहनेच बबलीचा जामीन केला. तुरूंगातून सुटल्यानंतर मागच्या एक वर्षापासून बबली महल बादशाही येथे प्रेम सिंह सोबत राहत होती. पण बबलीचे सासरे राजवीर सिंह याचा त्याला आक्षेप होता. म्हणून बबली आणि प्रेम सिंह दोघे त्यांना मार्गातून हटवणाची वाट पाहत होते.बबली सासरे राजवीर यांना आपल्यासोबत महल बादशाही येथे घेऊन गेली. बुधवारी रात्री राजवीर यांना बाजरीच्या शेतात नेऊन दोघांनी त्यांची हत्या केली. बबलीच्या सासूने पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. तक्रार करताना त्या म्हणाल्या, “माझी सून बबलीने तिचा प्रियकर प्रेम सिंगसोबत मिळून माझ्या पतीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांनी त्यांचा मृतदेह बाजरीच्या शेतात फेकून दिला, असा आरोप सासूने केला होता.
आरोपी सून बबली आणि तिचा प्रियकर प्रेमसिंह हे दोघेही आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. मृत सासरे राजवीर सिंह हे आपल्या मुलाच्या हत्येप्रकरणात न्यायासाठी झगडत होते. पण अखेर त्यांचीही हत्या करण्यात आली. पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.