
लोकलमध्ये महिलांचे एकमेकींच्या झिंज्या उपटत हाणामारी
महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, बघा का झाला वाद?
मुंबई दि ६(प्रतिनिधी) – आजवर लोकलमध्ये वाद झाल्याचे अनेक प्रसंग आपण पाहिले आहेत. पण आता लोकल ट्रेनमध्येच महिला प्रवाशांची फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ट्रान्स हार्बर लोकल मार्गावरील ठाणे ते पनवेल लोकलमध्ये हा प्रकार घडला. बसण्याच्या जागेवरुन झालेल्या क्षुल्लक वादातून महिला आपापसात भिडल्या. हा प्रकार ट्रेनच्या डब्यातील इतर महिलांनी कॅमेरात कैद झाला आहे.
ट्रान्स लोकल कोपरखैरणे स्थानकात येताच एक महिला ट्रेनमध्ये चढली. तुर्भे स्थानकात जागा झाल्यामुळे ती बसली, मात्र तिने एका छोट्या मुलीला बसू दिलं नाही, या कारणावरुन तीन महिलांमध्ये पहिल्यांदा शाब्दिक वाद झाला. पण अचानक महिलांनी एकमेकींच्या झिंज्या उपटण्यास आणि हाणामारी करण्यास सुरुवात केली. पण यांचे भांडण सोडवताना एक महिला पोलीस जखमी झाली. नेरूळ स्थानकावर महिला पोलीस कर्मचारी भांडण सोडवण्यासाठी चढल्या असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. लोकलमध्ये नेरूळपर्यंत महिलांचे भांडण सुरुच होते.हा प्रकार डब्यातील इतर महिलांनी कॅमेरात कैद केला आहे.
महिलांच्या लोकल डब्यातील भांडणं काही नवीन नाहीत. वादावादी, हमरीतुमरी दर काही दिवसांनी होत असते, मात्र यावेळी काही महिला प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणाने मारामारीचं रुप घेतलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.