Latest Marathi News
Ganesh J GIF

शिवसेनेचा धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा?

निवडणूक आयोगासमोर उद्या महत्वाची सुनावणी,यांचे पारडे जड?इओ

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- दसरा मेळाव्याची लढाई संपल्यावर आता ठाकरे आणि शिंदे गटात चिन्हाची लढाई होणार आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे याबाबत फैसला उद्या होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, त्यासाठी उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.त्यामुळे चिन्हाचा निर्णय काय होतो याची उत्सुकता असणार आहे.

शिवसनेचं धनुष्य बाण चिन्ह कोणाला मिळणार या संदर्भात ७ तारखेला निवडणूक आयोगात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट कागदपत्रं सादर करणार आहेत. शिंदे गट सातत्याने आम्हीच शिवसेना असून आमच्या बाजूने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्य़ांपैकी दोन तृतीयांश सदस्य सोबत असल्याचा दावा केला आहे. शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली होती.निवडणूक आयोगाने शिंदे गटाला तसे आदेशही दिले होते. पण शिंदे गटाकडून अद्यापपर्यंत कोणतीही कागदपत्र मिळाली नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. दोन्ही कागदपत्रे निवडणूक आयोगाला न आल्यामुळे सध्याची स्थिती निवडणूक आयोगाला कायम ठेवावी लागणार आहे.

सध्याच्या स्थितीत शिंदे गटाकडे विधीमंडळातले तर ठाकरे गटाकडे संघटनेचे बहुमत आहे. धनुष्यबाण आम्हालाच मिळेल, असा ठाकरे गटाचा दावा आहे. तर शिंदे गटानेही चिन्हाव दावा ठोकला आहे.त्यामुळे उद्या आयोग काय निर्णय घेणार याची उत्सुकता असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!