Latest Marathi News
Ganesh J GIF

“यशवंत”च्या निवडणूकीत शेतकरी विकास आघाडीचा १८ जांगावर विजय, २१ पैकी १८ जागा जिंकून रचला इतिहास,यशवंतच्या निवडणूकीत अनेक दिग्गजांचा पराभव

तर माधव आण्णा काळभोर यांच्या रयत सहकार ला केवळ तीन जागांवर यश 

लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अण्णासाहेब मगर रयत शेतकरी सहकार पॅनल माधव काळभोर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत होते तर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनल प्रमुख माजी सभापती प्रकाश जगताप,माजी संचालक पांडुरंग काळे,माजी संचालक बाळासाहेब चौधरी,बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखाली झाली.दोन्ही पॅनलमध्ये सरळ सरळ लढत होती.

या निकालामध्ये शेतकरी विकास आघाडीने तब्बल 18 जागा मिळवत एकतर्फी विजय संपादन केला तर रयत सहकार पॅनलला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले. मतमोजणी रविवार दिनांक १०रोजी महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथे पार पडली यावेळी दोन्ही पॅनलमध्ये काही ठिकाणी चुरस दिसली तर काही ठिकाणी एकतर्फी विजय संपादन करण्यात आला आला असून यामध्ये प्रत्येक गटात 600 पेक्षा जास्त मते बाद झाली असून शेतकरी विकास आघाडी पॅनलने रयत सहकार पॅनलचा धुवा उडवले.

यामध्ये गट क्रमांक एक मध्ये शेतकरी विकास आघडीचे उमेदवार सुनील सुभाष कांचन,(५४२२) संतोष आबासाहेब कांचन(५६३९) सुशांत सुनिल दरेकर,(५०५१)हे विजयी झाले असून गट क्रमांक २मध्ये शेतकरी विकास आघाडीचे ताराचंद साहेबराव कोलते,(५१९०) विजय किसन चौधरी,(५३०५) शशिकांत मुरलीधर चौधरी(५२०१) हे विजयी झाले गट क्रमांक तीनमध्ये शेतकरी विकास आघाडीचे दोन तर रयत सहकाराचा एक उमेदवार निवडून आला मोरेश्वर पांडुरंग काळे,(५२५२) नवनाथ तुकाराम(५१६१) काकडे योगेश प्रल्हाद काळभोर(४९५६)हे निवडून आले गट क्रमांक ४मध्ये शेतकरी विकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आले राहुल सुभाष घुले(५४८२) अमोल प्रल्हाद हरपळे (५४०८) निवडून आले तर ब वर्ग सोसायटी गटात सागर अशोक काळभोर(२०२) हे विजयी झाले.गट गट क्रमांक पाच मध्ये किशोर उंद्रे,(५२१७) रामदास सिताराम गायकवाड(५२२३) हे निवडून आले.गट क्रमांक६ मध्ये शेतकरी विकास आघाडीचा एक तर रयत सहकारचा निवडून आला सुभाष चंद्रकांत जगताप (५४६६) शामराव सोपान कोतवाल (४८९ ८) महिला राखीव मध्ये रत्‍नाबाई माणिक काळभोर(५६४१) हेमा मिलिंद काळभोर(५४४५)या दोन्ही शेतकरी विकास आघाडीचे महिला विजयी झाल्या.  मागास प्रवर्गांमधून शेतकरी विकास आघाडीचे मोहन खंडेराव म्हेत्रे विजयी झाले त्यांना(४५१८)मते पडली अनुसूचित जाती जमाती मधून शेतकरी विकास आघाडीचे दिलीप नाना शिंदे हे विजयी झाले (५६९५) मते पडली शेतकरी विकास आघाडीचे तब्बल अठरा उमेदवार निवडून आले तर अण्णासाहेब मगर रयत शेतकरी सहकार पॅनल फक्त तीनच उमेदवार निवडून आले प्रत्येक गटात सहाशेच्या पुढे मते बाद झाली आहेत.

यशवंत सहकारी साखर कारखान्याचा सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी शेतकरी विकास आघाडी पॅनल बहुमताने निवडून आल्यामुळे एकच जल्लोष केला ढोल ताशाचा गजर गुलालाची मुक्त उधळण परत फटाक्यांची आतषबाजी करून विजय उत्सव साजरा केला यावेळी रस्त्यामध्ये प्रचंड गर्दी झालेली होती सर्व कार्यकर्ते गुलालाची मुक्त उधळण करत घोषणा बाजीने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी पॅनल प्रमुख हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप यांच्या सहा नंबर गटांमध्ये मोठे मताधिक्य मिळाले तसेच यशवंतची निवडणूक लावण्यासाठी माजी संचालक पांडुरंग आप्पा काळे यांनी प्रत्येक गटात सभासदांमध्ये जी जनजागृती केली व कोर्ट कचेरी करुन कारखाना वाचला त्यामुळे शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले असल्याची चर्चा सभासदांमध्ये होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!