तू दिसायला अजिबात चांगली नाहीस तुला नोकरी का मिळत नाही?
नराधम पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, वर्षभरापुर्वीच झाला होता विवाह
केरळ – पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केरळमधील मलप्पुरममध्ये घडली होती. आता एका आठवड्यानंतर, पोलिसांनी तिच्या पतीला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
विष्णुजा असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर प्रभीन असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. विष्णुजा आणि प्रभीन या दोघांचा विवाह मे २०२३ मध्ये झाला. लग्नानंतर काही महिने आनंदात गेल्यानंतर विष्णुजाचा छळ सुरु झाला. तु सुंदर नाहीस, तुला नोकरी का मिळत नाही? असे विचारत मारहाण करत असे. तो तिला म्हणत असे की तु खूप बारीक दिसते. तो तिला त्याच्या बाइकवरही बसू देत नसे आणि म्हणत असे की ती कुरूप आहे. प्रभिन विष्णुजावर लक्ष ठेवण्यासाठी तिच्या व्हॉट्सॲप अकाउंटला त्याच्या फोनमध्ये लिंक करत असे. विष्णुजाने याबद्दल कोणालाही सांगू नये यासाठी तो प्रयत्न करत असे. विष्णुजाचे वडील म्हणाले की, प्रभीन माझ्या मुलीला कायम सांगायचा तू सडपातळ दिसली पाहिजेस. एवढंच नाही तर तो तिला कधी मोटरसायकलवर बसवूनही फिरायला न्यायचा नाही. तू दिसायला आकर्षक नाहीस, मी तुला बाहेर घेऊन जाणार नाहीस असं तिला सांगायचा. तू नोकरी कर आणि पैसे कमवून मला दे असंही तिला सांगायचा. तिने काही ठिकाणी मुलाखती दिल्या, परीक्षा दिल्या पण तिला नोकरी मिळाली नाही. तिने तिच्या परिने पूर्ण प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. त्यावरुनही तो प्रभीन तिचा मानसिक छळ करत होता, असा आरोप केला आहे. प्रभीनचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते अशीही माहिती मी ऐकली आहे असाही आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
पोलिसांनी आरोपी पती प्रभिनवर आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि तरुणीविरुद्ध क्रूरता केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रभीन आणि त्याच्या नातेवाईकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विष्णुजाच्या कुटुंबीयांनी केली आहे.