‘बापाची विचारधारा सोडून देता तुम्हाला लाज वाटायला पाहिजे’
शिंदे गटाच्या 'या' मंत्र्याची उद्धव ठाकरेंवर टिका करताना जीभ घसरली, बघा अजुन काय म्हणाले...
बीड दि २५(प्रतिनिधी)- “आम्हाला गद्दार म्हणता, पण ज्या बापानी तुम्हाला जन्माला घातलं त्यांची विचारधारा तुम्ही सोडून दिली, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे”, अशा शब्दात शिंदे सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. शरद पवारांच्या मांडीवर बसून बाळासाहेबांचे विचार सोडून देण्याचं काम तुम्ही केलं, असं देखील सावंत म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांना इशारा देखील दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेतील बंडखोर आणि महाविकास आघाडी यांच्यात सतत शाब्दिक चकमकीच्या उडत आहेत. सुरूवातीला उद्धव ठाकरेंवर टिका करणार नाही असे म्हणणारे शिंदे गटाचे आमदार मंत्री आता उद्धव ठाकरेंवर जोरदार टिका करत आहेत. तानाजी सावंत यांनी तर उद्धव ठाकरेंसह सर्वांवरच टिका केली आहे. ते म्हणाले की, माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही. असा टोला लगावताना उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.उद्धव ठाकरे आम्हाला म्हणतात की तुम्ही माझ्या बापाचे फोटो लावू नका. पण, तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो का लावता, शिवाजी महाराज आणि तुमचा संबंध काय असा थेट सवाल सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
तानाजी सावंत कधीकाळी मातोश्री म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जायचे. मात्र आता शिंदे गटात गेल्यापासून तानाजी सावंत उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत.त्यामुळे त्यांनी बीडमध्ये जोरदार टिका केली पण यावेळी पातळी सोडून टिका केल्यमुळे याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.