Latest Marathi News
Ganesh J GIF

…म्हणून तरूणाने केली तरुणीची डोक्यात दगड घालून हत्या

हत्येचे कारण समोर आल्यावर पोलिसही चकित, कट रचत अशी केली हत्या

यवतमाळ – यवतमाळमध्ये एका विद्यार्थीनीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपी तरुणाने पीडित तरुणीला यवतमाळ शहराजवळील मादनी घटात नेऊन हत्या केली आहे. आरोपीनं पीडितेच्या डोक्यात मोठा दगड घालून ही हत्या केली आहे. यामुळे यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रमोद नथ्थूजी कोंदाने असं आरोपी तरुणाचं नाव असून मृत तरुणीचं नाव धनश्री पेटकर आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार
८ महिन्यापूर्वी धनश्री पेटकर हिने आरोपीच्या गाडीला स्टेट बँक चौकात ठोस मारली होती. पण तरीही जमावाकडून आरोपीला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे आरोपी दुखावला होता. त्यावेळेस त्याने धनश्रीला धडा शिकवण्याचा कट रचला. धनश्री वाघापूर परिसरात राहत होती तर प्रमोद हासुद्धा वाघापूर परिसरात राहात होता. त्यामुळे प्रमोदने धनश्रीसोबत मैत्री करण्याचे ठरवले. दोघांची मैत्री झाल्यानंतर त्यांची भेट झाली तर ते बोलत घरी जात होते. घटनेच्या दिवशी धनश्रीचा धामणगाव मार्गावर असलेल्या वाधवानी महाविद्यालयात पेपर होता. मात्र तिची दुचाकी सुरू होत नसल्याने प्रमोदने तिला काॅलेजला सोडले. धनश्रीने पेपर सुटल्यानंतर त्याला घ्यायला बोलाविले. त्यावेळी प्रमोदने शेतातील मजूरांना पैसे देण्यासाठी जायचे असल्याने तू सोबत येतेस की, घरी जाते, असा प्रश्न केला. मात्र दहाच मिनिटाचे काम असल्याने धनश्री त्याच्यासोबत गेली. मात्र आरोपीने बोरगाव घाटात गाडी थांबवली आणि तिला जाब विचारत माझ्यासोबत केलेल्या अपघातामुळे मला लोकांनी मारहाण केली होती. तुझ्यामुळे मला लोकानी मारले व तु सुध्दा नेहमी माझ्याकडे पाहुन हसते आणि मला चिडवतेस, असे म्हणत तिला धकाबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यानंतर धनश्रीला जमिनीवर पाडून जवळ असलेला दगड उचलून आरोपीने तिच्या डोक्यात टाकून तीची हत्या केली. किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे गुन्ह्यात कोणताही ठोस पुरावा नसूनसुद्धा कौशल्याने स्थानिक गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पुढील तपास सध्या ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!