Latest Marathi News
Ganesh J GIF

यु टयुबरने इंडियाच्या स्टार खेळाडूला आपल्या प्रेमात केले क्लिनबोल्ड

भारताचा स्टार क्रिकेटपटू अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे फेमस युट्यबर, लव्हबर्ड अडकले लग्नाच्या बेडीत

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेटसंघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी २० मालिका खेळण्यात व्यस्त असताना भारताचा स्टार गोलंदाज नवदीप सैनीने लग्नगाठ बांधली आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड आणि यु ट्युबर स्वाती अस्थाना हिच्याशी लग्न केले आहे. दोघेही अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते.

नवदीप सैनी आणि स्वाती अनेक दिवसापासून एकत्र होते. नवदीप सैनीने त्याच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर फोटो शेअर लग्नाची माहिती दिली. यावेळी त्याने लिहिलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. यामध्ये त्याने लिहिलेले आहे की, तुझ्यासोबत प्रत्येक दिवस हा प्रेमाचा दिवस असतो. आम्ही आमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. शेअर केलेल्या फोटोत दोघेही सुंदर दिसत आहेत. नवदीपने शेरवानी घातली आहे, तर स्वातीने पांढरा लेहेंगा घातला आहे. दरम्यान नवदीप सैनीबाबत बोलायचे झाल्यास तो बऱ्याच कालावधीपासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने टीम इंडियाकडून २ कसोटी, ८ वन डे आणि ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले आहे. स्वाती अस्थानाचे एक युट्यूब चॅनेलही आहे. इन्स्टाग्रामवरही ती प्रसिद्ध असून तिच्या पेजवर ८० हजरांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

नवदीप सैनी हा हरियाणातील कर्नालचा रहिवासी आहे. नवदीप सैनीच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याला अनेक भारतीय क्रिकेट खेळाडूंनी लग्नाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कमेंट करत चाहते देखील त्याला शुभेच्छा देत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!