Latest Marathi News

दोरीने गळा आवळून एकाचा खून..पुण्यातील घटना

बोपदेव घाटातील वळणावर काढला काटा...?

पुणे – तरूणाचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह बोपदेव घाटातील सेल्फी पॉइंटनजीक फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपींसह मृताच्या नातेवाईकांचा शोध घेणे सुरू केले आहे.ही घटना 14 जूनला संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास उघडकीस आली. पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटातील दुसऱ्या वळणाच्या डावीकडे सेल्फी पॉइंटनजीक मृतदेह सापडल्याची माहिती एका नागरिकाने कंट्रोलला दिली होती. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन पाहणी केली असता 35 वयोगटातील तरूणाचा नॉयलन दोरीने गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या डोक्यात हत्याराने वार केल्याचेही निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरोपींसह मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.https://youtu.be/ao_8uuwP6RI

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!