Latest Marathi News
Ganesh J GIF

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने या कारणासाठी मागीतली लाच….!

पोलीस दलात मोठी खळबळ..! बातमी बघा

सांगली : एक हजार रुपयांची लाच घेताना एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. रिक्षाचालकावर कारवाई न करण्यासाठी मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात कार्यरत असणा-या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवीशंकर चव्हाण यास लाच स्विकारताना अटक करण्यात आली आहे.

कशी केली कारवाई 

मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे याठिकाणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणा-या रवीशंकर रामचंद्र चव्‍हाण (वय 53) याने एका वडाप रिक्षा चालकास कारवाई न करण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केली. ही मागणी चव्हाण याने 10 जूनला केली होती. त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने लाचलुचपत विभागाकडे याबाबतची तक्रार नोंदवली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर 15 जूनला महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या बाहेर सापळा रचून रिक्षाचालकाकडून एका हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रवीशंकर चव्‍हाण यास रंगेहात पकडले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!