
मुंबई विशेष प्रतिनिधी – कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांबरोबर वाहनधारकांची झालेली हुज्जत ही आपण अनेकवेळा पाहिली असेल. पण खारघरमध्ये वेगळाच प्रकार समोर आला आहे. विरुध्द दिशेकडून येणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत असताना एका कार चालकाने वाहतुक पोलिसाला चक्क 800 मिटर ते देखील गाडीच्या बोनेटवर बसवत फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. केवळ कारवाईमुळे वाहनधारकाने हे टोकाचे पाऊल उचलले. या सर्व प्रकाराची मोबाईल शूटींग केल्याने समोर आला आहे. खालघर वाहतूक शाखा परिसरात ही घटना घडली आहे. संबंधितावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नेमकी घटना कशी घडली…?
खारघर पोलीस वाहतूक अंमलदार नामदेव गादेकर हे नेहमीप्रमाणे कोपरा ब्रीज येथे कर्तव्य बजावत होते. या ब्रीजवर विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनांवर ते कारवाई करीत होते. याच दरम्यान, विरुध्द बाजूने MH-46, BZ 6296 ही होंडाई कंपनीची कार भरधाव वेगात आली होती. त्यामुळे गादेकर यांनी थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारवाईच्या धास्तीने वाहनचालकाने कार थांबवलीच नाही. डिमार्ट कडे रोड जाणाऱ्या कोपरा ब्रीज ते स्वर्णा गंगा ज्वेलरी शॉप खारघर या ठिकाणा पर्यंत गाडीच्या बोनेट वर टांगून गादेकर यांना फरपटत नेले.
लाइव्ह व्हिडिओ बघा…!