Just another WordPress site

सख्ख्या भावाचा बहिणीवर एकदा नव्हे तर दोन वेळा बलात्कार….! खळबळजनक घटना

बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या बहिणीवर बलात्कार केल्याची घटना गोव्यात घडली आहे. या घटनेने संपूर्ण गोवा हादरलाय. याप्रकरणी पोलिसांनी नराधम भावाला अटकही केली आहे. तर पुढील तपास केला जातो आहे. उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यामध्ये ही खळबळजनक घटना घडली. गुरुवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे एकदा नव्हे तर दोन वेळा पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. दहा दिवसांच्या आतच दोन वेळा पीडितेवर बलात्काराचा प्रयत्न झाला होता. दुसऱ्या वेळी या पीडितेने कशीबशी आपली सुटका करुन घेत स्वतःचं वाचवलं. पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनंतर आता कारवाई करण्यात आली आहे. गोव्यातील एका स्थानिक दैनिकानं याबाबतचं वृत्त दिलंय. सत्तरी तालुक्यातील वाळपई पोलिसांत एका पीडित मुलीकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. या मुलीचं वय 19 वर्ष आहेत. या मुलीने आपल्या 24 वर्षांच्या भावावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. या मुलीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी केली जाते आहे.

GIF Advt
दोन वेळा बलात्काराचा प्रयत्न

24 वर्षीय भावाना आपल्या सख्या बहिणीवर दोन वेळा अतिप्रसंग केला. 26 जून रोजी पहिल्यांदा पीडितेसोबत तिच्या सख्ख्या भावाने गैरकृत्य केलं. त्यानंतर 3 जुलैलाही त्याने असाच प्रयत्न केला होता. यावेळी कशीबळी पीडितेनं आपली सुटका करुन घेतली. अखेर हिंमत करुन वाळपई येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. 7 जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर अखेर पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. सध्या संशयिताची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे. तसंच पीडितेचीही मेडिकल टेस्ट करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एकूण या घटनेमुळे संपूर्ण गोव्यात खळबळ माजलीये.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!