Latest Marathi News
Ganesh J GIF

‘नो-एंट्री’ वरुन झाला वाद….वाहतूक पोलिसासोबत पुढ काय घडल..? ही बातमी बघा

 पुणे शहर प्रतिनिधी – ‘नो-एंट्री’वरून दुचाकीवरून जाणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार वानवडी परिसरात समोर आला आहे. यावरुन धक्काबुक्की केलेल्या व्यक्तीला वानवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना गोळीबार मैदानाजवळ घडली आहे. 26 वर्षीय शफाक अश्फाक शेख असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी असलेल्या अमर साळवे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

साळवे हे गोळीबार मैदानाजवळील परिसरात वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी त्यांनी नो एंट्रीवरून दुचाकीवरून आलेल्या शफाकची चौकशी केली. चौकशी सुरू असताना संतापलेल्या शफाकने साळवे यांना शिवीगाळ करत लाथा मारल्या आणि मारहाण केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास पीएसआय संतोष गायकवाड करीत आहेत.

पुण्यात अनेक ठिकाणी नो एंन्ट्री आहे. नो एंन्ट्री असलेल्या ठिकाणी कायम ट्राफिक पोलीस उभे असतात. अनेक दुचाकी स्वारांना अडवतात. दुचाकीस्वार अनेकदा पोलिसांना वाईट शब्दात बोलून निघून जातात. मात्र यावेळी थेट पोलिसांवरच धक्काबुक्की करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!