श्रीनगर विशेष प्रतिनिधी – जम्मू-काश्मीरच्या अमरनाथ येथे ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरनाथमध्ये होली गुहेजवळ संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र अमरनाथच्या यात्रेला गेलेल्या तब्बल 10 ते 15 हजार भाविकांवर आज मोठं संकट कोसळलं. अमरनाथमध्ये होली गुहेजवळ अचानक मोठा पाऊस झाला. खरंतर ही ढगफुटीच होती. या ढगफुटीमुळे गुहेजवळ पाण्याच्या प्रवाहाने अक्षरश: हाहाकार माजवल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत आतापर्यंत 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे 10 ते 15 हजार भाविक प्रभावित झाले आहेत. ते सध्या अमरनाथमध्ये अडकून पडले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी रेस्क्यू टीम पोहोचली आहे. बचावाचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
जम्मू-काश्मीरच्या अमरनाथ येथे ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरनाथमध्ये होली गुहेजवळ संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. विशेष म्हणजे सध्या अमरनाथची यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान ढगफुटीची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ढगफुटीत काही भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर पोलीस याबाबत लवकरच स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे.