
शिवसेनेत फूट पडत असल्याची चर्चा जोरात सुरू असताना आता दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॉट रिचेबल असणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. आणि राजकीय घडामोडींना वेग आला. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्वतःही शिवसेनेतून बाहेर पडलेले नेते आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे याचंच बंड शिवसेनेतील सर्वात मोठं मानलं जातंय. तसंच स्वतः शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नेत्याने शिवसेनेतून आता बाहेर पडत असलेल्या नेत्याचं कौतुक राणेंनी केलंय. सध्या शिवसेनेत खळबळ उडाली असताना अशातच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरूवात झालीय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सूचक ट्वीट करत मोठे वक्तव्य केले आहे. यावरून आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत. नेमके काय म्हणाले नारायण राणे?
…नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता – राणे
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे अनेक आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आलीय. यावर नारायण राणेंनी एक ट्वीट करत म्हटलंय की, “शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता…”