Latest Marathi News
Ganesh J GIF

मविआ सरकार कोसळल्यानंतर भाजपसोबत जाणार का? पवार काय म्हणाले… ही बातमी बघा

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख शिल्पकार असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले आहे. मागील अडीच वर्षांपासून सरकार चालत असल्याने हे षडयंत्र रचण्यात आले असल्याचे पवार यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाल्यानंतरही अशा प्रकारची बंडाळी झाली होती असेही त्यांनी सांगितले. भाजपसोबत सरकार स्थापन करणार, असा प्रश्न विचारल्यानंतर पवार यांनी थेट उत्तर देण्याचे टाळत ‘सेन्सिबल’ प्रश्न विचारा असेही त्यांनी पत्रकारांना म्हटले.

शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, नेमकं काय झालं याची माहिती घेतली जात आहे. मागील अडीच वर्षांपासून सरकार चालत असल्याने हे षडयंत्र रचले गेले आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याआधीदेखील असं झालं होतं. त्यावेळी काही आमदारांना हरयाणात ठेवण्यात आलं होतं,  असेही पवार यांनी म्हटले. 

शरद पवार यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. महाविकास आघाडी सरकार म्हणून एकत्र आहोत. शिवसेनेच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून ठोस निर्णय, रणनीति आखू असेही त्यांनी म्हटले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!