Latest Marathi News

महाराष्ट्रातून १०० टक्के पंतप्रधान मोदींनाच समर्थन!

चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा, शिंदे गटाच्या खासदाराच्या मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपाचा प्रवास

चिंचवड दि ११(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच हवे आहेत. मात्र त्यांना हरविण्यासाठी २८ पक्ष एकत्र आले असले, तरी देखील १०० टक्के पसंती मोदी यांनाच मिळणार, बारामतीही आम्हीच जिंकू, असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,” महाविकास आघाडीला जनता ४४० व्होल्टचा करंट लावणार . कॉंग्रेसने केलेली पापं पंतप्रधान मोदी यांनी धुवून काढली आहेत.

बुधवारी प्रदेशाध्यक्षांनी मावळ लोकसभा मतदारसंघात प्रवास केला त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, देश एकच असल्याने कोणत्याही राज्याचा कार्यक्रम इतर कोणत्याही राज्यात होऊ शकतो. त्यामुळे व्हायब्रंट गुजरात कार्यक्रम मुंबई होत आहे, त्यावर राजकारण करणे व कार्यक्रमांना गालबोट लावणे योग्य नाही, असेही ते म्हणाले. कॉंग्रेसचे आमदार तथा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राहूल गांधी यांना भाषण देता येत नाही तर ते नेते कसे, यावरून चिमटा काढत, त्याच्या विधानविषयी शंका उपस्थित केली. उद्धव ठाकरे यांच्या सेनेत लोकसभेपूर्वी केवळ चारच नेते दिसतील. शरद पवारांची राष्ट्रावादीही किंचित झाल्याशिवाय राहणार नाही. अजित पवार यांच्याच नेतृत्त्वात पुढील काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये महाराष्ट्रात दिसेल, यासाठी ते दिवसरात्र मेहनत करीत आहेत. शिंदे आणि पवार दोघेही विकासाचे राजकारण करीत आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला क्रमांक एकचे राज्य करण्याकरिता प्रयत्न करीत असल्याने भाजपात मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. महाविकास आघाडीला निवडणुकीत उमेदवार मिळणार नाही. सर्व २८८ मतदारसंघात भाजपा महायुतीच्या मागे ताकद उभी करेल. मावळ लोकसभा क्षेत्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत तसेच चिंचवड येथे मावळ, पिपंरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्सशी बावनकुळे यांनी संवाद साधाला. मावळ लोकसभा क्षेत्रातील ६०० सुपर वॉरिर्यस मतदारसंघातील प्रत्येक घरोघरी जाऊन पंतप्रधान मोदी यांच्यासाठी समर्थन मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. सोबतच त्यांनी पनवेल व चिंचवड येथे घर चलो अभियानात सहभागी होत जनतेशी संवास साधला.

पुढचा पंतप्रधान कोण? असा प्रश्न करताच सर्वांनी एकसुराने मोदी मोदी असा जयघोष केला. यासोबतच त्यांनी स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली व मान्यवर प्रतिष्ठित नागरिकांच्या स्नेह भेट घेतली, विविध विषयावर चर्चा करतानाच त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी समर्थन मागितले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!