Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे एन्काऊंटर केले जाणार होते

शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक गाैप्यस्फोट, आमदाराचा मातोश्रीकडे निर्देश? नक्की काय केला दावा?

मुंबई दि ११(प्रतिनिधी)-शिवसेनेत फूट पडून आता दीड वर्ष होत आली आहेत. तरी आरोप प्रत्यारोप अजूनही सुरु आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक मोठ्या गाैप्यस्फोट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गाैप्यस्फोट केला. ते म्हणाले, नक्षलवाद्यांच्या हातून एकनाथ शिंदे यांचे एन्काऊंटर करणार होते. त्यामुळे त्यांचे संरक्षण काढले होते. मी जबाबदारीने हा गौप्यस्फोट करत आहे”, असा दावा संजय गायकवाड यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, जर आम्ही उद्धव ठाकरे यांचे हात घेतले नसते, तर आज कदाचित एकनाथ शिंदे जिवंत दिसले नसते. गडचिरोलीला एकनाथ शिंदे जेव्हा पालकमंत्री होते, तेव्हा त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कडक भूमिका घेतली होती. त्यामुळे नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी दिली होती. शिंदेंच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून, राज्य सरकारने शंभूराज देसाई तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांच्या घरी बैठक बोलावली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा प्रयत्न झाला. तितक्यात उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन शंभूराज देसाईंना फोन करुन शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका असं सांगितलं. त्याचा अर्थ काय होतो? की एकनाथ शिंदेंना मरण्याकरिता नक्षलवाद्यांच्या तोंडी द्यायचं. एकप्रकारे त्यांना पक्षातून आणि जीवनातून संपवण्याचा कट होता. असाही दावा त्यांनी केला आहे. यावर बोलताना शंभुराजे देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, एकदा नव्हे तर दोन वेळा शिंदेना धमकीची पत्रं आली होती. ती पत्रं आपण पोलिसांकडे त्यावेळी दिली. शिंदेंच्या परिवाराचाही त्यामध्ये उल्लेख होता. विधानसभेमध्येही यावर चर्चा झाली. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी तातडीने उपाययोजना करण्याचा निर्देश दिले होते. त्यावर झालेल्या बैठकीनंतर शिंदेंना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे यावर एकमत झालं. तसा प्रस्ताव उद्धव ठाकरेंच्याकडे पाठवण्यात आला. त्या बैठकीच्या दिवशी उद्धव ठाकरेंचा फोन आला. बैठकीबद्दल माहिती घेतली. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं की अशा प्रकारे शिंदेना सुरक्षा देता येणार नाही. दरम्यान थेट उद्धव ठाकरेंना यात ओढण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून याला प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. एकंदरीत आगामी काळात यावरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

यावेळी संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. राऊत यांना मला सांगायचे की, त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यापेक्षा उद्धव ठाकरे याचा जो ललित पाटील सोबत फोटो आहे, तो फोटो आधी पाहावा. मग उद्धव ठाकरेचे ललित पाटीलशी संबंध कसा? असा आरोप आम्ही करायचा का? असे गायकवाड म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!