Latest Marathi News
Ganesh J GIF

12 हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात,बघा नेमकी कशी केली कारवाई..?

सोलापूर विशेष प्रतिनिधी – रेल्वे स्टेशन परिसरात उभ्या करण्यात येणार्‍या गाड्यांवर कारवाई न करण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच  स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने  सापळा रचून एका पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सूर्यकांत क्षीरसागर (वय ३४, रा. सदर बझार पोलीस ठाणे, अंतर्गत रेल्वे स्टेशन पोलीस चौकी, सोलापूर शहर) असे या अटक  केलेल्याचे नाव आहे.

सोलापूर येथील रेल्वे स्टेशन परिसरात तक्रारदार तसेच त्यांच्या ओळखीचे काही व्यावसायिक त्यांच्या खासगी गाड्या प्रवासी वाहतुकीकरीता उभ्या करतात. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर याने तक्रारदार व त्याच्या ओळखीच्या इतरांच्या गाड्यांवर कोणतीही कारवाई न करण्याकरीता मासिक हप्ता स्वरुपात १३ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करताना प्रशांत क्षीरसागर याने तडजोड करुन १२ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

त्यानंतर पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर अधीक्षक सुरज गुरव , पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार शिरीषकुकार सोनवणे, अतुल घाडगे, श्रीराम घुगे, प्रमोद पकाले, उमेश पवार, शाम सुरवसे यांनी सापळा रचला. तक्रारदाराकडून १२ हजार रुपये स्वीकारताना उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर याला पकडण्यात आले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!