बिग बॉस फेम अभिजित बीचुकले त्यांच्या विविध कारणांमुळे चर्चेत असतात. देशाचा पंतप्रधान होण्याची इच्छा बाळगणारे अभिजित बिचुकले यांनी मोठी घोषणा केली आहे.
विधानसभेच्या 288 जागा लढणार असल्याचे बीचुकले यांनी जाहीर केले आहे. मुलींना दहावी पर्यंतचे शिक्षण मोफत द्यावे अशी मागणी देखील बिचुकले यांनी केली आहे.
अभिजीत बिचुकले यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
अभिजित बिचुकले यांनी विधानसभेला 288 जागा लढणार असल्याचे आज जाहीर केलं आहे. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने बालवाडी ते 10 वी पर्यंतचे मुलींना सर्व शाळांमध्ये मोफत शिक्षण द्यावे अशी मागणी देखील बिचुकले यांनी केली. तशा आशा आशयाचे पत्र देखील बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.
पुणे पोटनिवडणुकीत पराभव
पुणे पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकले यांचा दारुण पराभव झाला होता. अभिजीत बिचुकले आणि आनंद दवेंना मतदारांनी नाकारले होते. बिचुकलेंना 5 तर दवेंना 100 मत मिळाली होती. दोघांच्या मतांची संख्या नोटापेक्षाही कमी होती.
बिचुकले यांनी दिला होता शिंदे गटाला पाठिंबा
नेहमीच आपल्या विधानामुळे चर्चेत येणारे अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला होता. बिचुकले यांनी वर्षावर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदेंचं अभिनंदन केले. साताऱ्याच्या गादीचा वैचारिक वारसदार असल्याचं सांगत येणाऱ्या काही दिवसांत भूमिका मांडणार असल्याचं बिचुकले यांनी स्पष्ट केले होते.
मतदान यादीतून नाव गायब झाल्यामुळे बिचुकले चिडले
पुणे पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांचं नाव मतदान यादीतून गायब झाल्यामुळे वाद निर्माण झाला होता. बिचुकले हे उमेदवार असतानाही त्यांना मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. बिचुकले साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मतदान केंद्रावर मतदानासाठी आले. मात्र नाव नसल्यामुळे त्यांनी गोंधळ घातला होता.
पोटनुवडणूकीच्या वेळी अपहरण केल्याचा बिचुकले यांचा आरोप
सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील 2018 च्या पोटनुवडणूकीच्या वेळी काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांनी माझे अपहरण करून जबरदस्तीने माझा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला होता, असा खबळजनक आरोप साताऱ्याचे नेते अभिजित बिचुकले यांनी केला होता. सांगली मध्ये बिचुकले हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्याकडून कुटुंबाला धोका असून, कदम यांच्यावर कारवाई केली नाही तर, सांगलीत आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही बिचुकले यांनी दिला आहे.