
खोऱ्यात ३५ बंदुका पाठवल्या आहेत, पण ब्रेक फेल झाले नाहीत
पहिला प्लॅन फसल्याने अतिरेक्यांचा पहलगामला गोळीबार, एका माॅडेलचा धक्कादायक दावा, म्हणाली कुराण...
श्रीनगर – काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन २७ भारतीय पर्यटकांचे जीव घेतले होते. या हल्ल्यानंतर लष्कराने पाच अतिरेक्यांना पकडण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे.
लष्कराचे जवान अरितेक्यांचा शोध घेत आहेत. पण या दरम्यान एक मॉडेल एकता तिवारी हिने मोठा गाैप्यस्फोट केला आहे. आमचा २० जणांचा ग्रुप १३ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी गेला होता. आम्ही २० एप्रिल रोजी पहलगाम येथे पोहोचलो. त्याच दिवशी आम्हाला काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. त्यामुळे आम्ही बेसरनपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर उतरलो. त्यावेळी आजूबाजूच्या काही लोकांचे इरादे आम्हाला बरोबर वाटत नव्हते. ते आम्हाला कुराण पठण करण्यासा सांगत होते. आम्ही जेव्हा खेचरावर बसून चढाई करत होतो, त्यादरम्यान, दोघेजण आम्हाला भेटले. त्यांनी माझ्याबाबत विचारले. तसेच आमच्या ग्रृपमध्ये किती लोक आहेत, याबाबत विचारणा केली. त्यांनी आम्हाला कुठल्या धर्माचे आहात, हिंदू की मुस्लिम? असे विचारले. त्याशिवाय त्यांनी आम्हाला कुराण पढण्यासही सांगितले होते.तसेच गळ्यात रुद्राक्ष का परिधान केले आहेत, असेही विचारले. त्यावर माझ्या भावाने आम्हाला रुद्राक्ष धारण करायला आवडतात, असं सांगितलं. त्यानंतर आमची त्यांच्यासोबत थोडी वादावादी झाली. तसेच आम्ही त्यांच्या खेचरांवरून उतरून दुसऱ्या खेचरवाल्याच्या मदतीने माघारी आलो, असे एकता म्हणाली आहे. आमच्यासोबत वादावादी झाल्यानंतर त्यांच्यापैकी एका व्यक्तीला फोन आला. त्याने थोडं बाजूला जाऊन सांगितलं की, प्लॅन ए फेल झाला आहे. ते खोऱ्यामध्ये ३५ बंदुका पाठवण्याबाबत बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकून मला आलेला संशय अधिकच दृढ झाला. तसेच ज्या तरुणाने ३५ बंदुकांबाबत बोलणं केलं होत, त्याचा फोटो माझ्याकडे आहे. तसेच दहशतवाद्यांचे स्केच समोर आल्यानंतर मी त्याला ओळखलं आहे, असेही एकता म्हणाली आहे.
एकता तिवारी २०१६ पासून जयपूर, राजस्थान येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रेमनगर दौसा शाखेच्या शाखा व्यवस्थापक आहे. २०२० मध्ये नोकरी सोडल्यानंतर, ती २०२३ मध्ये जौनपूरमधील मौर्य मार्केटमध्ये राहू लागली. तिचे पती प्रशांत तिवारी हे जल निगममधील जल जीवन मिशनचे वरिष्ठ अभियंता आहेत.