Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर तब्बल ४५ कोटींचा खर्च

बंगल्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधींची उधळपट्टी, विरोधक आक्रमक, भाजपाची टिका

दिल्ली दि २६(प्रतिनिधी) – सत्ता भल्याभल्यांना बदलायला भाग पाडते कारण मुख्यमंत्री होण्याआधी घर, सुरक्षा आणि कोणतेही सरकारी वाहन घेणार नाही असे म्हणणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल ४५ कोटींचा खर्च केला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणावर सुमारे ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ८ लाख रुपयांचा पडदा आणि मार्बल बसवण्यासाठी १ कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर वस्तूंवरही खर्च करण्यात आला आहे. बंगल्याच्या इंटेरियर डेकोरेशनसाठी ११.३० कोटी, मार्बल फ्लोअरिंगसाठी ६ कोटी, इलेक्ट्रिक वायरिंगसाठी २.५८ कोटी रुपये, अग्नीशमन व्यवस्थेसाठी २.८५ कोटी, किचन नूतनीकरणासाठी १.१ कोटी, ऑफिसच्या उभारणीसाठी खर्च ८.११ कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. यावरून आता भाजपाने केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे केजरीवाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना संकटाच्या काळात बंगल्याच्या सजावटीसाठी इतके पैसे का खर्च करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केजरीवाल यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. अरविंद केजरीवाल यांचा खरा चेहरा आणि प्रामाणिकपणा उघड झाल्याची टीका भाजप नेत्याने केली आहे. दरम्यान घराच्या कामासाठी पहिली मंजुरी १ सप्टेंबर २०२० रोजी मिळाली होती. दुसरी मंजुरी मे २०२१ मध्ये देण्यात आली होती. दुसरीकडे बांधकाम विभागाकडील माहितीनुसार सिव्हील, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग कामांव्यतिरिक्त विविध वॅटेज आणि आकाराचे स्मार्ट लायटिंग फिक्स्चर, ऊर्जा कार्यक्षम पंखे ८०, डंबवेटर लिफ्टही या खर्चाचा भाग आहेत.

“जोपर्यंत तुम्ही दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची किंमत पंतप्रधानांच्या निवासस्थानाशी आणि इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाशी करत नाही, तर तो खर्च कमी की जास्त हे तुम्हाला कसे समजणार” असे म्हणत आपने भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!