Latest Marathi News
Ganesh J GIF

रॅपिडो चालकाने विनयभंगाचा प्रयत्न केल्याने तरूणीने मारली उडी

धावत्या रॅपिडो बाइकवरून महिलेची उडी, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल, आरोपी अटकेत

बंगळुरु दि २६(प्रतिनिधी)- रॅपिडो बाइकचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने घाबरलेल्या एका महिलेने धावत्या रॅपिडो बाइकवरून उडी मारल्याची घटना बंगळुरूतून समोर आली आहे. या बाइक चालकाने महिलेसोबत छेडछाड केली तसेच तिच्या अपहरणाचाही प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेने रॅपिडो राइड बुक केली होती. इंदिरानगरला तिला जायच होतं. ड्रायव्हरने तिला ११ वाजून १० मिनिटांनी पीक केले. ड्रायव्हर असलेल्या बायकरने ओडीपी चेक करण्याच्या बहाण्याने या महिलेकडून तिचा फोन घेतला. त्यानंतर त्याने एअर पोर्टच्या दिशेने बाईक न्यायला सुरुवात केली. यावेळी त्याने तिचा विनयभंगाचा प्रयत्न केला. ती ड्रायव्हरला योग्य मार्गावरुन जायला सांगत होती. पण ड्रायव्हर काही ऐकत नव्हता. अखेर या महिलेने स्व:ला वाचवण्यासाठी धावत्या बाईकवरुन उडी मारली. उडी मारल्यानंतर ती रस्त्यावर थोडे अंतर फरफटत गेली. तेवढ्यात काही लोक तिच्या मदतीसाठी आले त्यानंतर त्या चालकाने तिथून पळ काढला. पीडित महिलेने तक्रार दाखल केली असून ती एका खासगी संस्थेत काम करते. महिलेला पिक करत त्याने त्याच भागात एक चक्कर मारल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी आरोपी रॅपिडो चालकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचे नाव दीपक राव असे आहे. ड्रायव्हर हैदराबादचा आहे. तो मागच्या ५ वर्षांपासून बंगळुरुत राहत आहे. पोलीस त्याचा जुना रेकाॅर्ड तपासत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!