Just another WordPress site

पुण्यातील नवले पुलावर ४७ गाड्या एकमेकांवर आदळल्या

नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात, अनेक जण जखमी

पुणे दि २०(प्रतिनिधी)- पुण्यातील नवले ब्रीजवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून भरधाव टॅंकरने अनेक गाड्या उडवल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात एकूण ४७ गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान सदर ठिकाणी अग्निशमन विभागाच्या ०२ रेस्क्यू वाहन काम करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नर्हेजवळील दरी पुल येथे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४० ते ५० वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. कटेंनरने धडक दिल्याने वाहनं एकमेकांवर धडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुण्यातील या भीषण अपघातात अग्निशमन दलाच्या २ रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवानांकडून बचावकार्य सुरू आहे. या अपघातात गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाल्याचे पाहायला मिळाले.तर अनेकजण जखमी झाले आहेत.

GIF Advt

नवले पूल हा अपघातासाठी ओळखला जातो. काही दिवसापूर्वीच कात्रजच्या दिशेने जाताना ट्रकच्या चाकाखाली येऊन मागे बसलेल्या वैशाली कांबळे या महिलेचा मृत्यू झाला होता. हा पुल अपघातासाठी कुप्रसिद्ध आहे. इथे सतत अपघात होत असतात. महामार्ग प्राधिकरण कार्यवाही करण्याएैवजी बघ्याची भुमिका घेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!