अजित पवार शांत बसणार नाहीत ते दिवाळीपर्यंत दगाफटका करणारच’
'यांचा' मोठा गाैप्यस्फोट, शरद पवारांच्या राजीनाम्यावरही भाष्य, राजकीय भूकंप होणारच
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील संभाव्य भूंकप टळला आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांचेही संभाव्य बंड टळले आहे. पण आता नवा गाैप्यस्फोट करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीत पुन्हा एकच जल्लोष पाहायला मिळाला. पण सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना अजित पवार यांचं बंड अजूनही थांबलेलं आहे असं वाटत नाही. या संदर्भात अंजली दमानिया यांनी मोठं विधान केलं आहे. त्या म्हणाल्या “अजित पवार भरपूर काम करतात. भ्रष्टाचारही करतात. त्याविरोधात मी लढलेही आहे. अजित पवार यांची आता ना घर का ना घाटका अशी परिस्थिती झाली आहे. ते शांत बसतील असं मला वाटत नाही येत्या काही दिवसांत, महिन्यांत म्हणजे दिवाळीपर्यंत ते पुन्हा दगाफटका करतील यात शंका नाही,” असा सनसनाटी गाैप्यस्फोट अंजली दमानिया यांनी केला आहे. त्याचबरोबर शरद पवार यांनी त्यांच्या राजीनाम्यावर ठाम राहायला हवं होतं. नव्या नेतृत्वाला संधी द्यायला हवी होती. पण पवार यांनी खेळी करून बॅटही माझी आणि चेंडूही माझा हे दाखवून दिलं. पण ते शरद पवार आहेत.ते शेवटपर्यंत सत्ता सोडणार नाहीत,अशी टिकाही दमानिया यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे या राष्ट्रीय लेव्हलला बघतील आणि अजित पवार राज्य सांभाळतील असे समजावण्यात आले. पण २ मे रोजी शरद पवार यांनी भलताच निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवार अस्वस्थ आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाण्याचा प्लॅन त्यांनी रचला होता. पण ते तोंडघशी पसरल्यासारखे झाले आहेत. असा आरोप दमानियांनी केला आहे.