Latest Marathi News
Ganesh J GIF

खासदार संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

राऊत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार, 'या' भाजप नेत्याचा मोठा दावा, राजकारणात खळबळ?

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- संजय राऊत यांना कट्टर शिवसेना नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेतल्या मोठ्या बंडानंतरही त्यांनी कायम उद्धव ठाकरेंची साथ दिली. पण आता तेच संजय राऊत ठाकरेंची साथ सोडत लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, भाजपचे नेते नितेश राणे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राणे म्हणाले, मला माझ्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत त्यांची तशी बोलणीही सुरु आहेत. तसचं, मागच्या काही दिवसांपासून पाहिलं तर राऊत हे नेहमीच अजित पवारांवर टीका करत आले आहेत. कारण राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी त्यांनी अट ठेवली आहे, ती अट अशी की अजित पवार ज्यावेळी पक्ष सोडतील तेव्हाच मी राष्ट्रवादीत प्रवेश करेन. आता उद्धव ठाकरेंचं काही खरं नाही. त्यांचा स्वत:चा पक्ष राहिलेला नाही. मला उद्धव ठाकरे पुन्हा खासदार बनवू शकत नाहीत. म्हणून मला आता उद्धव ठाकरेंसोबत राहायचं नाही, असं राऊत यांनी राष्ट्रवादीत सांगितल्याचं राणे म्हणाले आहेत. यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टिका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकरणी महाराष्ट्र पेटवून देण्याची भाषा केली होती. त्याला नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र सोडा, साधी मुंबई बंद करून दाखवा. मुंबई जमत नसेल तर कलानगर बंद करून दाखवा, असं आव्हानच नितेश राणे यांनी ठाकरेंना दिले आहे.

संजय राऊत हा साप आहे. उद्धव ठाकरे सापाला दूध पाजत बसले आहेत. पण राऊत हा नाही बाळासाहेबांचा झाला ना तुमचा,उद्धव ठाकरेंचा होणार. राऊत यांनी बाळासाहेब असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये भांडणं लावली आणि तेच आता उद्धव ठाकरेंच्या घरात करत आहे. पण राऊत आता राष्ट्रवादीत जाणार असे राणे म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!