
मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेतील ४० आमदारांसोबत बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. पण मागचा दिड महिना उलटला तरी अजुनही मंत्रीमंडळाचा विस्तार होत नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यातच एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर आणि भाजप नेते निलेश राणे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. यामुळे शिंदे गटाकडून केसरकरांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. यावर बंडखोर आमदार उदय सामंत यांनी खुलासा करून शिंदे गटातीलच नेत्यांना अप्रत्यक्षरित्या आव्हान दिले आहे. त्यांचा हा इशारा एकनाथ शिंदेंना तर नाही ना अशी चर्चा रंगू लागली आहे.
भाजप नेते निलेश राणे आणि दिपक केसरकर यांच्या चांगलाच वाक्युद्ध रंगल होत.केसरकर यांनी टीका केल्यावर नितेश राणे हे ही जहरी टीका करत असल्याने हा वाद राज्यातील बड्या नेत्यांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर शिंदे दिपक केसरकर यांचे प्रवक्ते पद काढून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.यावर उदय सामंत म्हणाले की, दीपक केसरकर हेच आमचे मुख्यप्रवक्ते आहेत. ह्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये असे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी यात कोणाचाही उल्लेख केला नसला तरीही त्यांनी एकप्रकारे एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मा. दीपक केसरकर हेच आमचे मुख्यप्रवक्ते आहेत.. ह्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.. अफवांवर विश्वास ठेवू नये.
— Uday Samant (@samant_uday) August 6, 2022
अद्यापही मंत्रीमंडळ विस्ताराचा पत्ता नाही अन् शिंदे गट आणि भाजपातील नेत्यांमंध्ये आतापासूनच खडाजंगी पहायला मिळत असल्याने पुढे काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल असेच म्हणावे लागेल. या सगळ्या घडामोडींमुळे मंत्रिमंडळ विस्तारावर जोरदार मिम्सही सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत.