Latest Marathi News
Ganesh J GIF

बारामती लोकसभेसाठी भाजपाचा उमेदवार ठरला

मिशन बारामतीसाठी भाजपाने आखली 'ही' रणनिती

बारामती दि ७ (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकायचा, या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवून भाजपने आखणी सुरु केली आहे. मात्र, अनेक लाटांमध्येही पवारांनी बारामतीचा गड कायम राखला आहे, त्यामुळे तो जिंकणे भाजपला  सोपे नाही.संघटनात्मक पातळीवर नसलेली ताकद, बारामती विधानसभा मतदारसंघात मताधिक्य नसणे, ही भाजपच्या अपयशाची कारणे आहेत. मात्र, तोडीचा उमेदवार दिल्यास बारामतीची लढतही तुल्यबळ होऊ शकते. त्यामुळे सीतारामन यांच्या दाै-यातच भाजपाचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.

 

भाजपाकडून इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांपासून दौंडच्या कांचन कुल, वासुदेव काळे यांच्या नावाची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. सुप्रिया सुळे यांना बारामती, इंदापूर, भोर व पुरंदरमध्ये मताधिक्य मिळते.दाैंड खडकवासला मतदारसंघात त्या पिछाडीवर असतात, असा सर्वसाधारण अनुभव आहे. बारामतीत मिळणारे मताधिक्य हे सुप्रिया सुळे यांच्या विजयात सर्वात जास्त महत्वाचे ठरते. इंदापूरमध्ये विधानसभेला काहीही झाले, तर लोकसभेला सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळते, असा आजवरचा अनुभव आहे. भोरमध्येही त्यांना मताधिक्य मिळते, त्यामुळे त्यांचा विजय सुकर होतो. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल, याची आता उत्सुकता आहे. भाजपमधून अनेक नावांबाबत चर्चा सुरु आहे. मात्र, प्रत्यक्षात नेमकी कोणाला संधी मिळणार, हे गुलदस्त्यात आहे. एकीकडे सुप्रिया सुळे उमेदवार असणार हे निश्चित असताना भाजपकडे उमेदवाराच्या नावाबाबत शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय होत नाही, हेही भाजपच्या अपयशाचे कारण आहे.

कांता नलावडे आणि कांचन कुलांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिल्यानंतर त्यांना मतदारांपर्यंत पोहोचता आले नव्हते. आता हर्षवर्धन पाटील, वासुदेव काळे, कांचन कुल यांच्यापर्यंत अनेक नावांची भाजपमधून चर्चा सुरु आहे. प्रत्यक्षात दिल्लीतून या जागेबाबत काय निर्णय होतो, याचीच उत्सुकता आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप बारामतीबाबत नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!