पाकिस्तानातील आशिया कप रद्द होणार?
भारतासह या दोन देशांचा पाकिस्तानात खेळण्यास नकार, पाकिस्तानच्या अडचणी वाढणार
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- आशिया चषक २०२३ स्पर्धेवरून भारत-पाकिस्तान यांच्यातला वाद आणखी चिघळला आहे. आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानात होणार होती, परंतु बीसीसीआयने कोणत्याही परिस्थितीत टीम इंडियाला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता आशिया कपच रद्द होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानात सध्या तणावग्रस्त परिस्थिती आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेमुळे तेथील परिस्थिती अधिक बिघडली आहे. अशात बीसीसीआयने आशिया चषक स्पर्धेसाठी भारताला पाकिस्तान दौऱ्यावर न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकार सध्या आणीबाणी लावण्याचा विचार करत आहे. पण आता भारताबरोबरच बांग्लादेश आणि श्रीलंका हे दोन देश देखील आशिया कपमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. सध्या आशिया कप दुस-या देशात खेळण्याचा विचार करत आहे. मध्यंतरी पाकिस्तानने भारतासमोर आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत एक प्रस्ताव ठेवला होता. ज्यामध्ये भारत वगळता सर्व संघ पाकिस्तानमध्ये खेळतील, आणि भारताचे सामने तटस्थ ठिकाणी होतील. मात्र, भारतानेही हा प्रस्ताव फेटाळून लावला असून आता संपूर्ण स्पर्धा तटस्थ ठिकाणी व्हावी यासाठी जोर धरला आहे. श्रीलंका आणि बांगलादेशच्या क्रिकेट मंडळांनी तटस्थ ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्यासाठी पाकिस्तानचे मन वळवण्याचा अनौपचारिक प्रयत्न केला, परंतु त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता वाढली आहे. पण भारताने आशिया कपसाठी भारतात येण्यास नकार दिल्याने पाकिस्तानने देखील भारतात येण्यास नकार दिला आहे.
आयसीसी आमच्यावर बंदी घालू शकत नाही. जर आम्ही एखाद्या देशात सुरक्षेच्या कारणावरून जात नसू तर आमच्यावर बंदी घातली जाईल, असा कोणताच नियम नाही. आम्ही याच करणामुळे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात जाणार नाही, हेही सेठी यांनी स्पष्ट केले आहे.