Latest Marathi News
Ganesh J GIF

ही प्रसिद्ध अभिनेत्री करतेय नवेदित अभिनेत्याला डेट

अभिनेत्याची ती रिअॅक्शन सोशल मिडीयावर हिट, डिनरसाठी एकत्र झाले स्पाॅट

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये सध्या एका नवीन कपलची जोरदार चर्चा आहे. अभिनेता विजय वर्मा अलीकडे तमन्ना भाटियासोबतच्या त्याच्या जीवनातील रोमान्सबद्दलच्या अफवांमुळे चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याला याबद्दल विचारले असता त्याचा चेहरा बरेच काही सांगत होता.


दहाड चित्रपटाची सध्या चर्चा होत आहे. त्या निमित्त आयोजित प्रमोशनवेळी सोनाक्षी सिन्हानं जेव्हा विजयला तमन्नावरुन छेडले तेव्हा त्याने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. विजयने त्यावेळी शब्दांतून त्याच्या भावना व्यक्त केल्या नाहीत पण त्याच्या चेहऱ्यावरील ते हास्य खूप काही सांगून गेले. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यातून असे दिसून येते की, विजय आणि तमन्ना हे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या प्रतिक्रिया तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समोर आल्या आहेत. बऱ्याच दिवसांपासून विजय वर्मा आणि तमन्नाच्या डेटिंगची चर्चा रंगली आहे. तमन्नाच्या प्रश्नावरुन बोलते केले तेव्हा विजयचा चेहरा भलताच खुलला होता. विजय आणि तमन्नाच्या डेटिंगची चर्चा यापूर्वी देखील रंगली होती. नव्या वर्षात गोव्याला या दोन्ही सेलिब्रेटींचे व्हॅकेशन हे साऱ्या चाहत्यांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत होते. तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी दोघांना डिनर डेटला गेल्याचेही स्पॉट करण्यात आले होते.

तमन्ना बद्दल बोलायचे झाल्यास तमन्ना भाटियाकडे २०२३ मध्ये येणारे काही खास प्रोजेक्ट आहेत. तमन्ना भाटिया तिच्या २०२३ मधील अनेक बहु-भाषिक रिलीजसाठी सज्ज झाली आहे. तमन्ना आता आपल्याला मल्याळम चित्रपट “बांद्रा” मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे तेलुगुमध्ये “भोला शंकर”, तामिळमध्ये “जेलर” हे दोन हिंदी आगामी चित्रपट आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!