म्हणून बीसीसीआय आणि टाटा समूहाला लावावी लागणार एवढी झाडे
आयपीएलच्या शेवटच्या चार सामन्यात पडले तब्बल एवढे डाॅट बाॅल, पहा किती झाडे लावाली लागणार
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. चेन्नईचे हे पाचवे विजेतेपद आहे. पण या आयपीएलमध्ये शेवटच्या चार सामन्यात एखाद्या बाॅलरने डाॅट बाॅल टाकल्यावर झाडाचे चित्र दाखवले जात होते.त्यामुळे अनेकांना हा प्रकार आहे असा प्रश्न पडला होता. त्याबद्दल जाणून घेऊया?
प्लेऑफच्या पहिल्या सामन्यापासू ते अंतिम सामन्यापर्यंत डॉट बॉलच्या ग्राफिक्समध्ये बदल पाहायला मिळाला होता. या मॅचमध्ये फेकल्या जात असलेल्या डॉट बॉलच्या ऐवजी झाडाचे इमोजी दाखवण्यात येत होता. कारण बीबीसीआयने प्रत्येक डॉट बॉलसाठी ५०० झाडे लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिला सामना गुजरात विरूद्ध चेन्नई संघात झाला होता त्या सामन्यात एकूण ८४ डॉट बॉल टाकण्यात आले होते. तर मुंबई इंडियन्सने विरुद्ध लखनऊ सुपर जायंट सामन्यात एकूण ९६ डॉट बॉल टाकण्यात आले होते. तर गुजरात आणि मुंबई विरूद्धच्या सामन्यात ६७ डाॅट बाॅल टाकण्यात आले होते. तर अंतिम सामन्यात ४५ डॉट बॉल टाकण्यात आले होते. प्लेऑफमध्ये एकूण २९४ डॉट बॉल टाकण्यात आले आहेत. त्यामुळे बीसीसीआय आणि टाटा समूह एकूण १ लाख ४७ हजार झाडे लावावी लागणार आहेत. दुसरीकडे चेन्नईने आयपीएलची ट्राॅफी जिंकली असली तरी गुजरातच्या शुभमन गीलने ८९० धावा जिंकत आॅरेंज कॅप जिंकली तर गुजरातच्याच मोहम्मद शामीने सर्वाधिक २८ विकेट घेत पर्पल कॅप जिंकली आहे.
अखेरच्या चेंडूपर्यंत थरार झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. चेन्नईचे हे पाचवे जेतेपद आहे.या विजयामुळे चेन्नईने मुंबईची बरोबर केली आहे. अद्याप दिल्ली, पंजाब, आणि बेंगलोर या संघानी आयपीएल ट्राॅपी जिंकलेली नाही.