Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटाचे २२ आमदार ९ खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

राज्याच्या राजकारणात खळबळ, गजानन कीर्तिकरांच्या 'त्या' दाव्यानंतर राजकारणात भूकंप?

कोल्हापूर दि ३०(प्रतिनिधी)- शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी काही दिवसापुर्वी भाजप आपल्याला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला होता. त्यातच आता शिंदे गटाचे २२ आमदार आणि नऊ खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

कोल्हापुरात एका कार्यक्रमाकनिमित्त विनायक राऊत, दिवाकर रावते हे आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “मंत्री शंभूराज देसाई यांना काय करायचे ते करु द्या, एक मात्र नक्की की, शिंदे गटामध्ये गेलेले बऱ्याच आमदारांमध्ये असंतोष खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या असंतोषाला पहिली वाचा ही गजानन कीर्तिकर यांनी फोडली आहे. असे अनेक आमदार आहेत की ज्यांचा भ्रमनिरास झाला आहे. 50 खोके आणि कोट्यावधी रुपयांचा निधी देण्याचे कबूल करण्यात आले, पण आता तसं काही घडताना दिसत नाही. चार-पाच मंत्री सोडले तर बाकीच्यांना सर्वांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे सर्वांनाच असे वाटते की, आम्हाला फसवलेले. आपल्याला परतीचा मार्ग स्वीकारावा लागतोय, अशा भावना अनेकांची आहे. म्हणून सुरुवात गजानन कीर्तिकर यांनी केली. त्यामुळे आम्ही योग्य वेळेला जाहीर करु” असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला.

कोणत्याही परिस्थितीत ‘मातोश्री’चे दरवाजे या गद्दारांना उघडे राहणार नाही. परंतु यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल अशी स्पष्टोक्ती विनायक राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!