शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, 36 शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे एसीबीला पत्र
शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. यामुळे भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी एसीबीला पत्र लिहून ३६ शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शिक्षकांवर छापे पडले त्यांची खुली चौकशी करण्याची मागणी
शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकारी लाच घेताना पकडले जातात मात्र पुन्हा सेवेत येतात, पुन्हा भ्रष्टाचार करतात पण कारवाई होत नाही. त्यामुळे आयुक्त सुरज मांढरे यांनी एसीबीला पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. ज्या शिक्षकांवर छापे पडले त्यांची खुली चौकशी करण्याची मागणी एसीबीला लिहिलेल्या पत्रात सूरज मांढरे यांनी मागणी केली आहे. काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
राज्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेल्या काही वर्षांपासून भ्रष्ट कारभाराची कीड लागली आहे. शिक्षक बदल्यांसाठी अनेक अधिकारी आणि कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याच्या अनेक घटना समोर आल्य आहे. शिक्षक बदलीच्या फायलीवर आर्थिक वजन ठेवल्यानंतर शिक्षकांना सोयीच्या जिल्ह्यात बदली झाल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षात आपण पाहिली आहे. एवढच काय तर शिक्षक बदलीसाठी दरपत्रक देखील ठरल्याच्या चर्चा आहेत. साधी फाईल एका टेबल वरून दुसऱ्या टेबलवर पाठवण्यासाठी देखील पैसे घेतले जातात. एका प्रकरणात आउटवर्ड करून देण्यासाठी वीस हजार रुपयेची लाच घेण्यात आली. साधा लिपिक देखील मोठ्या कारमध्ये येतो. पैशाच्या मोबदल्यात बदल्या केल्या जातात.सरकारी कार्यालये, पोलिस स्थानकात भ्रष्टाचार चालतोच पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतो त्या शिक्षण क्षेत्रात देखील भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. गेल्या काही वर्षात एसीबीने उघड केलेली प्रकरणे पाहता भ्रष्टाचाराचा हा चढता आलेख चिंता वाढवणरा आहे.