पुणे : पुण्यातील येरवड्यात कोयता हातात घेत आरोपींकडून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हि घटना येरवड्यातील गांधी नगर मध्ये रविवारच्या सुमारास घडली आहे.
पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यामध्ये पुण्यात कोयता गँग आपली दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत आहे. येरवडा येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने पाठलाग करत एकास कोयता व काठीने मारहाण करून फिर्यादीला जखमी केले आहे. या प्रकरणी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांना अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे