Latest Marathi News
Ganesh J GIF

सावधान! शहाळ्यातील नारळपाणी पित आहात का?

सोशल मिडीयावर धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, पोलीसांचीही तात्काळ कारवाई, काय घडले?

दिल्ली दि ६(प्रतिनिधी)- नारळपाणी हे आरोग्यसाठी खुपच फायदेशीर असते. डाॅक्टरसुद्धा आपल्याला नारळपाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पण सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून नारळपाणी प्यावे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. या व्हिडिओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सध्या उन्हाळ्यात सुरु आहे. त्यामुळे अनेकजण थंडावा मिळावा म्हणून विविध पेयांचा आधार घेत असतात. त्यामध्ये शहाळ्यातील नारळपाणी पिण्याकडे अनेकांचा कल असतो. नोएडामधील एका नारळ विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचा रस्त्याच्या कडेला एका नारळ पाणी विक्रीचा स्टॉल आहे. पण नारळ विक्रेता बाजूला वाहत असलेल्या गटारातील सांडपाणी नारळांवर शिंपडत आहे. नोएडातील श्री राधा कृष्ण स्नायू गार्डन सोसायटीजवळील आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही तत्काळ दखल घेत यावर कारवाई करत नारळ विक्रेत्याला अटक केली आहे. समीर असे त्याचे नाव असून तो उत्तर प्रदेशमधील आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!