साऊथची अभिनेत्री असल्याने डिझायनर्स कपडे देण्यास नकार द्यायचे
या अभिनेत्री दाखवली बाॅलीवूडची काळी बाजू म्हणाली डिझायनर दाक्षिणात्य असल्यामुळे म्हणायचे.....
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- आपल्या अभिनयाच्या जोरावर साऊथ आणि बाॅलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी आपल्या एका विधानामुळे चर्चेत आली आहे. साऊथ चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे बाॅलीवूड डिझायनर्सने तिच्या सोबत भेदभाव करायचे असा आरोप तिने केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हंसिकाने हा दावा केला आहे . ती म्हणाली असे अनेक डिझायनर होते. दाक्षिणात्य कलाकारांना ते कपडे देण्यास नकार द्यायचे. आम्हाला आमचे कपडे द्यायचे नाहीत, असं म्हणायचे. पण आज ते लोक स्वतःहून येतात आणि म्हणतात की तुमचा कार्यक्रम आहे, तुमच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आहे, तर तुम्ही आमचे कपडे घाला. मी पण प्रेमाने होकार देते. कारण माझ्यात आणि त्यांच्यात फरक असायला हवा, असे म्हणत तिने आज चित्र बदलल्याचे अधोरेखित केले आहे.माझ्याकडे हे डिझायनर स्वतः येतील, असं काम मला करायचं होतं, ते मी केलंय आणि आता ते मला स्टाइल करण्यासाठी स्वतः फोन करतात असेही ती म्हणाली आहे.हंसिकाने पूर्वी घडलेल्या घटनांवरुन आणि डिझायनर्सच्या या वाईट वागणुकींबद्दल आता मनात कोणताही राग नसल्याचे सांगितले. पण ते डिझायनर कोण होते हे सांगण्यास मात्र तिने नकार दिला. त्याचबरोबर मी एक भारतीय अभिनेत्री असुन साऊथ बाॅलीवूड यातील अंतर आता मिटत असल्याचेही हंसिका म्हणाली आहे.
हंसिकाने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून शका लका बुम बुम मधून केली होती. तिने प्रीती झिंटा आणि ह्रतिक रोशनसोबत ‘कोई मिल गया’मध्ये काम केले होते. त्यानंतर तिने ‘सिंघम २’ (तमिळ), ‘बोगन’, ‘अंबाला’, ‘अरनमानाई’ सारख्या साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यासाठी तिला दाक्षिणात्य सिनेविश्वातील फिल्मफेअर देखील मिळाला आहे. हंसिकाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिचा बॉयफ्रेंड सोहेल कथुरियासोबत लग्न केले आहे.